Telangana makes Telugu compulsory in Schools : महाराष्ट्रात सर्व शाळा आणि सर्व बोर्डांमध्ये मराठी भाषा सक्तीची असली तरीही अनेक बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय पर्याय म्हणून शिकवला जातो. त्यामुळे सर्व शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा शिकवण्याची मागणी महाराष्ट्रात जोर धरत असताना तेलंगणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने सर्व शाळांमध्ये तेलुगु ही भाषा सक्तीची केली असून यासंदर्भात राज्य शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. हा आदेश सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बॅकलॅरिएट (आयबी) यासह सर्व बोर्डांशी संलग्न शाळांना लागू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवीन आदेश शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आदेश शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होईल. “हे २०१८ पासून हा निर्णय प्रलंबित आहे आणि सरकारने आता तो निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे”, असे शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

सीएसबीई इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मानक तेलुगू किंवा सिंगिडी ऐवजी “साधी तेलुगू” शिकण्याची परवानगी दिली जाईल. या भाषेला वेनेला म्हणतात, असे आदेशात म्हटले आहे. तेलंगणामधील बहुतेक शाळा सरकारी आहेत जिथे तेलुगू शिक्षण सामान्य आहे. परंतु, राज्याबाहेरील मंडळांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा मोठ्या प्रमाणात तेलुगू शिकवत नाहीत.

तेलुगू शिक्षण चालू ठेवण्याचा प्रयत्न

“तरुण पिढीसाठी तेलुगू शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तेलुगू अभिजात भाषा समितीने खूप पूर्वी केलेल्या शिफारशींपैकी ही एक होती”, असे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. योगायोगाने, तेलंगणाने तेलुगू भाषा सक्तीची करण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा शेजारील राज्य तामिळनाडू राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध करत आहे. कारण या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर हिंदी लादली जात आहे.

तेलंगणामध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त शाळा इंग्रजी माध्यमाच्या आहेत. हा निर्णय लागू करून इंग्रजीपासून दूर जाण्याचा प्रयत्न नसून विद्यार्थ्यांना मातृभाषेची ओळख होण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता आली पाहिजे, असं एका शिक्षणतज्ज्ञाने म्हटलं आहे. २००८ पासून सरकारी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. तेव्हा तेलंगणा आंध्र प्रदेशचा भाग होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana makes telugu compulsory in schools across boards sgk