पीटीआय, श्रीहरिकोटा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्राो) शंभराव्या मोहिमेची उलटगणती मंगळवारी सुरू झाली. ‘जीएसएलव्ही’ रॉकेटच्या सहाय्याने दळववळणाचा उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. ‘इस्राो’च्या अध्यक्षपदावर आल्यानंतर व्ही. नारायणन यांच्यासाठीची ही पहिलीच मोहीम असेल.

‘एनव्हीएस-०२’ हा उपग्रह बुधवारी (२९ जानेवारी) सकाळी ६.२३ वाजता अवकाशात सोडला जाईल. भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील (एनएव्हीआयसी) हा दुसरा उपग्रह आहे. भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग, वेळ या उपग्रहामुळे मिळेल. भारतीय भूभागापलीकडे दीड हजार किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवू शकेल. या उपग्रहमोहिमेची उलटगणती मंगळवारी पहाटे २.५३ वाजता सुरू झाली.

‘जीएसएलव्ही-एफ १५’ ५०.९ मीटर उंच असून, ‘जीएसएलव्ही-एफ-१२’ मोहिमेनंतर त्याचा वापरकेला जाणार आहे. ‘जीएसएलव्ही-एफ-१२’ मधून ‘एनव्हीएस-०१’ हा उपग्रह अवकाशात सोडला होता. २९ मे २०२३ रोजी त्याचे उड्डाण झाले होते. ‘एनएव्हीआयसी’मध्ये दुसऱ्या पिढीच्या पाच उपग्रहांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The satellite nvs 02 will be launched today amy