ईस्टर संडेला श्रीलंकेतील कोलंबो शहरात इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून येथे हल्ला होण्याची शक्यता श्रीलंकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. हे दहशतवादी सैन्याच्या गणवेशात येऊन हल्ला करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिनिस्टिरिअर सिक्युरिटी डिव्हीजनच्या (एमएसडी) प्रमुखांनी सांगितले की, इथे आणखी काही हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. एमएसडी पोलिसांचे युनिट, खासदार आणि सुरक्षेशी संबंधीत दुसऱ्या एजन्सीजला पत्र लिहून ही माहिती देण्यात आली आहे.

या पत्रात म्हटले आहे की, हल्लेखोर सैन्याचा गणवेशात घालून येऊ शकतात. यामध्ये हे देखील म्हले आहे की, दहशतवादी गेल्या रविवारीच आणखी पाच ठिकाणांवर स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे रविवारी अशी कोणतीही घटना घडली नाही, त्यामुळे त्यांनी यापुढेही अशीच काळजी घ्यावी असे बोलले जात आहे.

श्रीलंकेच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांनी आणि दोन विरोधी पक्ष नेत्यांनी हल्ल्याच्या या इशाऱ्याला पुष्टी दिली आहे. संसदेत या संभाव्य हल्ल्यासंबंधी माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, एनआयएने रविवारी आयसिसच्या कासरगोड मॉड्यूलची चौकशी करताना केरळमध्ये तीन जागी छापेमारी केली होती. कासरगोड आणि पालक्कड येथील चार संशयीतांच्या घरावर छापे मारून ही कारवाई करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The threat of attack again in sri lanka can come in military uniforms and create attack