पुलवामा येथे काल (सोमवार) दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आईडी स्फोटात गंभीररित्या जखमी झालेले दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. उपचारांदरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला. पुलवामातील अरिहल येथे राष्ट्रीय रायफल्सच्या एक गस्ती वाहनाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी, लष्कराचे बुलेट आणि माईन प्रुफ वाहन ४४ राष्ट्रीय रायफलला दहशतवाद्यांनी टार्गेट केले होते. यामध्ये ९ जवान जखमी झाले होते. दरम्यान, उपचारांदरम्यान गंभीररित्या जखमी झालेले दोन जवान आज शहीद झाले. त्याचबरोबर २ स्थानिक नागरिकही या हल्ल्यात जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी वाहनांत भरुन आणलेल्या आईडीचा स्फोट घडवून आणला होता.

दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आत्मघाती आईडी स्फोट घडवून आणला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two army personnel who were injured in ied attack pulwama yesterday have succumbed aau