अकरावीत शिकणाऱ्या तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली असून त्याबाबत २६ डिसेंबरला मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. ही तरूणी कॉलेजमधून घरी येत असताना अण्णू व त्याचे मित्र राजेश व ललित यांनी तिला मोटारीत लिफ्ट देऊ केली, तिने नकार देताच त्यांनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नंतर ही मुलगी नागला हांसी येथे घरी येऊन पोहोचली. तिने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली, नंतर तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण ती नोंदवली गेली नाही. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. नंतर तिचे वडील पोलीस उप अधीक्षक गुलाब सिंग यांना भेटले, त्यानंतर तक्रार नोंदविण्यात आली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-12-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh class xi student gangraped in mathura