Vice President Jagdeep Dhankhar Health Update : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी पहाटे अस्वस्थ वाटू लागल्याने आणि छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७३ वर्षीय धनखड यांना पहाटे २ वाजता रुग्णालयात नेण्यात आले आणि एम्समधील कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एम्स रुग्णालयात दाखल असलेल्या जगदीप धनखड यांची भेट घेतली.

बातमी अपडेट होत आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vice president jagdeep dhankhar admitted in aiims for chest pain sgk