औषधं महागणार अशा बातम्या येत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने बाहेरून येणाऱ्या औषधांवरील आयात शुल्क रद्द केलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने त्रस्त आहेत आणि त्यांना परदेशातून औषधे आयात करावी लागत आहेत, अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय दुर्मिळ रोग धोरण २०२१ (National Rare Disease Policy 2021)अंतर्गत सूचीबद्ध सर्व दुर्मीळ आजारांच्या उपचारांसाठी आयात केलेल्या औषधांवर आणि विशेष अन्नावरील (special food) मूलभूत आयात शुल्क सरकारने रद्द केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सवलतीचा लाभ कसा मिळवाल?

ही सवलत फक्त अशा लोकांनाच मिळेल जे वैयक्तिक वापरासाठी औषधे आयात करतील. तसेच सरकारने कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या Pembrolizumab (Keytruda)वर सूट दिली आहे. या सूटचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक आयातदाराला केंद्र किंवा राज्य आरोग्य सेवा संचालक, जिल्हा वैद्यकीय अधिकारी किंवा जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From 1 april 2023 import of medicines will not be expensive the government has canceled the import duty vrd
First published on: 30-03-2023 at 14:36 IST