तुम्ही कधी विमानातून प्रवास केला आहे का? तुम्ही प्रवास करताना किंवा करण्याआधी तुमच्या मनात खूप प्रश्न असतील. होय ना! पण त तुम्हाला हा प्रश्न कधी पडला का, की उड्डाण करताना अचानक विमानाचा दरवाजा किंवा आपत्कालीन दरवाजा उघडला तर काय होईल? नुकतेच डेल्टा एअरलाइनच्या एका प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला होता. पण सुदैवाने, विमान लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर (LAX) असताना ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढेच नाही तर 3 महिन्यांपूर्वी एक प्रवाशाने चेन्नई ते तिरुचिरापल्ली जाणाऱ्या इंडिगो विमानाचा आपातकालीन दरवाज अचानक उघडला होता. तथापि, तो प्रवाशाला पकण्यात आले. पण विमानातील लोक त्यावेळी खूप घाबरले होते. विमानातून प्रवास करताना प्रवाशांच्या मनात हा प्रश्न येतो की, अचानक आपात्कालिन दरवाजा उघडला तर काय करायचे? आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती देणार आहोत.

  • विमानाचे आपत्कालीन दरवाजा जोरदार वाऱ्याच्या दरम्यान उघडता येत नाही.
  • हे केबिनच्या दाबामुळे होते, ज्यामुळे एका व्यक्तीला आपत्कालीन दरवाजा उघडणे थोडे कठीण होते.
  • जमिनीवर उभारलेल्या विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघडू शकतो पण तरीही केबिन स्टाफद्वारा त्याला लॉक केले जाते. त्यामुळे हा दरवाजा उघडणे फार अवघड असते.
  • याशिवाय पायलटजवळ देखील काही सिग्नल्स लावलेले असतात, कोणताही दार उघडले तरी पायलटला समजते आणि ते बंद देखील करू शकतात.

हेही वाचा – या गावात नाही एकही रस्ता, कार-बाईकशिवाय कसा करतात कसा प्रवास करतात? जाणून घ्या

केबिनमधील दबावामुळे बंद राहतो दरवाजा

आपत्कालीन दरवाजे हे ‘प्लग दरवाजे’ असतात जे हवेच्या दाबाने बाहेरून आणि आतून बंद करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. जसे इंजिन सुरू होते आणि केबिनच्या हवेवर दबाव येतो तेव्हा प्लगचा दरवाजा सक्रिय होतो. इनटेक लॉक करण्यासाठी केबिनवर दबावाची आवश्यकता असते.

दरवाजा उघडण्यासाठी लागते जास्त ताकद

आतल्या दाब बाहेरच्या एअर प्रेशरपेक्षा जास्त असल्यामुळे, आपात्तकालिन द्वार बाहेरच्या बाजूनला नव्हे उलट आतल्या बाजूला ओढून खेचला जातो. म्हणजे हा इमर्जन्सी दरवाजा उघडण्यासाठी सुमारे 3 ते 4 लोकांची गरज भासणार आहे, हा दरवाजा उघडणे एका व्यक्तीसाठी सोपे काम नाही.

हेहा वाचा : तुम्ही तुमच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या काय सांगतो कायदा

जेव्हा दरवाजा उघडला जातो तेव्हा केबिनमधील दाब कमी होतो

आपत्कालीन दरवाजे उघडल्यास, केबिनमधील दाब ताबडतोब कमी होतो आणि अशा प्रकारे ऑक्सिजन मास्क खाली पडतात. एवढेच नाही तर हे ऑक्सिजन मास्क लावण्याची वेळ केवळ 15 सेकंद आहे, कारण 36,000 फूट उंचीवर विमानातीलमधील हवा गोठू लागते. अशा प्रकारे प्रवाशाला दम्याचा झटका, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मास्कसोबतच प्रवाशांना सीट बेल्ट घालण्याचाही सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा तुम्ही एखाद्या चित्रपटाप्रमाणे उडत विमाना बाहेर जाऊ शकता.

10 हजार फुटांवर आणण्याचा पायलटचा प्रयत्न

केबिनमध्ये हळूहळू वाढत्या दबावाच्या परिस्थितीमुळे प्रवाशांना अधिक अस्वस्थता येते आणि ऑक्सिजन मास्क मर्यादित काळासाठी चालू असतात. तो संपल्यावर प्रवासी बेशुद्ध होऊ शकतात आणि अशा स्थितीत त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. पण यामध्ये वैमानिकांचीही महत्त्वाची भूमिका आहे, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी विमानाला १० हजार फूट उंचीवर नेणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या दरम्यान केबिनमधील दबाव कमी केला जाऊ शकते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What happens if passenger opens emergency door in flight snk
First published on: 30-03-2023 at 16:45 IST