scorecardresearch

तुम्ही तुमच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या काय सांगतो कायदा

इन्कम टॅक्स कायद्यानुसार, घरात किती पैसे साठवले जातात यावर कोणताही प्रतिबंध नाही पण…

Do You Know How Much Cash A Person Can Store In Their House?
तुम्ही तुमच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकता? जाणून घ्या काय सांगतो कायदा (Image Credit Unplash)

भारतात, डिजिटल व्यवहार सुरु झाल्यापासून नागरिक नव्याने निर्माण झालेल्या सामान्य परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. दुसरीकडे, अजूनही बहुसंख्य भारतीय असे आहेत जे घरात पैसे ठेवण्याच्या पारंपारिक पद्धतीवर अवलंबून असतात आणि त्यावर विश्वास ठेवतात. तुम्ही त्यापैकी एक आहात का? तुम्हीही या पद्धतींचा अवलंब करु शकता पण तुम्हाला माहीत आहे का, घरात किती रक्कम ठेवता येईल यावर काही निर्बंध आहेत? जर तुम्ही व्यापारी असाल तर घरी रोख रक्कम ठेवणे सामान्य गोष्ट आहे पण जर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तुमच्या घरावर छापे टाकला तर? तुम्हाला तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करायचे असेल तर जाणून सविस्तर घ्या.

प्राप्तिकर कायद्यानुसार, घरात किती पैसे साठवले जातात यावर कोणताही प्रतिबंध नाही. परंतु प्राप्तिकर विभागाच्या छाप्यामध्ये, जर एखाद्या व्यक्तीने त्याच्याकडे असलेल्या पैशांचा स्रोत सादर केला पाहिजे. विशेषतः पैसे बेहिशेबी उत्पन्नामध्ये नसावेत. जर तुमची कागदपत्रे घरात ठेवलेल्या रकमेशी जुळत नसतील तर प्राप्तिकर अधिकारी तुम्हाला दंड करू शकतात. अशा परिस्थितीत, प्राप्तिकर कर्मचारी बेहिशेबी पैसे जप्त करतील आणि दंड एकूण पैशाच्या १३७ % पर्यंत असू शकतो.

एखादी व्यक्ती त्यांच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? (unpash)
एखादी व्यक्ती त्यांच्या घरात किती रोख रक्कम ठेवू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? ( Unplash)

हेही वाचा पगारदार नोकरवर्गासाठी मोठी बातमी! पीएफवरील व्याजदरात वाढ; सध्याच्या ८.०५ टक्क्यांवरून व्याजदर…

प्राप्तिकर विभागाने तयार केलेल्या रोख रखमेसंबंधित हे नियम नेहमी लक्षात ठेवा.

  • कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कर्जासाठी किंवा ठेवीसाठी २०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रोख स्वीकारण्याची परवानगी नाही. व्यक्तीच्या स्थावर मालमत्तेच्या कोणत्याही हस्तांतरणासही हा नियम लागू होतो.
  • कोणत्याही आर्थिक वर्षात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रोखीचे व्यवहार बेहिशेबी असल्यास आणि त्याचा कोणताही स्रोत नसेल तरच दंड आकारू शकतात.
  • सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशननुसार, एकावेळी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी पॅन क्रमांक आणि तपशील दर्शविणे आवश्यक आहे.
  • खातेदाराने एका वर्षात २० लाख रुपये रोख जमा केल्यास त्याला पॅन आणि आधार माहिती दाखवावी लागेल.
  • ३० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेद्वारे मालमत्तेची खरेदी किंवा विक्री पूर्ण झाल्यास कोणत्याही भारतीय व्यक्तीला स्क्रूटनी ऑफ सिटिझन इंव्हेस्टीगेशन एजन्सीला समारे जाऊ लागू शकते.
  • क्रेडिट-डेबिट कार्डच्या पेमेंट दरम्यान, कार्डधारकाने एका वेळी १ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे भरले तर त्या व्यक्तीविरुद्ध चौकशी होऊ शकते.
  • एका दिवसात नातेवाईकांकडून सुमारे २ लाख रुपयांची रोख रक्कम घेता येत नाही. बँकेमार्फत ही प्रक्रिया पार पाडावी लागेल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 13:51 IST

संबंधित बातम्या