Luggage Stolen in Train: आपल्या देशात रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. अशामध्ये प्रवाशांसाठी आपल्या सामानाची सुरक्षा करणे कोणत्याही आव्हानापेक्षा कमी नाही. प्रवासादरम्यान सामान चोरी होण्याच्या घटना आपण नेहमी पाहिल्या आणि ऐकल्या असतील. पण तुमच्यासोबतही अशीच घटना घडली तर? अशा परिस्थितीमध्ये काय करावे याचा विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. रेल्वे प्रवासदरम्यान सामान चोरीला गेल्यावर काय करावे? सामान चोरीला गेल्यावर मिळते नुकसान भरपाई तुम्हाला माहित आहे का? की रेल्वेने प्रवास केल्यावर जर कुठल्याही प्रवाशाचे सामान चोरीला गेले तर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई मिळते. जर कधी रेल्वे प्रवासात तुमचे सामान चोरीला गेले तर सर्वात आधी तक्रार नोंदवा. जर तक्रार केल्यावर तुमचे सामान मिळाले नाही तर, भारतीय रेल्वेकडूऩ चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या सामानाची नुकसान भरपाई दिली. पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करावे लागते. हेही वाचा : आता रेल्वेच्या डब्यांमध्ये मिळणार रेस्टॉरंटचा अनुभव; अंधेरी, बोरिवली स्थानकावर सुरु होणार रेस्टॉरंट-ऑन-व्हील भारतीय रेल्वे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता सामानाची चोरी झाल्यावर करा हे काम रेल्वेच्या वेबसाइटनुसार, जर प्रवासात प्रवाशाचे सामान रेल्वेमधून चोरी होते तेव्हा तो तुम्हाला सर्वात आधी ट्रेन कोच अटेंडेंट, गार्ड या जीआरपी एस्कॉर्टला संपर्क करणे आवश्यक आहे. या लोकांकडून तुम्हाला तुम्हाला प्राथमिक फॉर्म उपलब्ध होईल. हा फॉर्म भरून आवश्यक कार्यासाठी ठाण्यात पाठवला जाईल. जर तुम्ही तुमचा प्रवास पूर्ण करायचा असेल तर हे तक्रार पत्र तुम्ही रेल्वे स्टेशनवर आरपीएफ सहाय्य चौक्यांना देखील देऊ शकता. हेही वाचा : प्रवाशाने अचानक विमानाचा आपात्कालिन दरवाजा उघडला तर काय होईल? जाणून घ्या प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता बुक केलेल्या वस्तूंसाठी पूर्ण भरपाई मिळवा जर तुम्ही तुमचे सामान रेल्वेच्या लगेजमध्ये बुक केले असेल आणि शुल्क भरले असेल, तर सामानाचे नुकसान किंवा गहाळ झाल्यास रेल्वे जबाबदार असेल. अशा परिस्थितीत, भरपाई म्हणून, तुम्हाला रेल्वेकडून सामानाची संपूर्ण किंमत दिली जाईल. परंतु, जर तुम्ही सामान बुकिंग केले नसेल, तर फक्त 100 रुपये प्रति किलो भरपाई मिळेल.