Meaning of Word Video : व्हिडीओ (Video) हा शब्द आपण दररोज वापरतो. दिवसभर आपल्या स्मार्टफोनवर, टीव्हीवर आपण व्हिडोओ पाहतो. परंतु, हा व्हिडीओ शब्द कुठून आला? त्याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? असा प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं नसेल तर आम्ही तुम्हाला ते उत्तर देऊ. Video (व्हिडीओ) हा शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे आणि त्याचे मूळ लॅटिन भाषेतील ‘videre’ या क्रियापदात आहे. ‘videre’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘पाहणे’ किंवा ‘दिसणे’ असा आहे. हाच शब्द पुढे इंग्रजी भाषेत Video म्हणून रुढ झाला. त्यानंतर जगभरातील अनेक भाषांमध्ये हा शब्द असाच वापरला जाऊ लागला जो आजही तसाच वापरला जात आहे.

मराठीतही आपण हाच शब्द वापरत आहोत. मराठी भाषेत त्यासाठी चित्रफित हा शब्द असला तरी व्हिडीओ हा शब्द मराठीतही पूर्णपणे मिसळला आहे. Video या शब्दाचा वापर प्रामुख्याने दृष्य माध्यमांसाठी (जसे की चित्रपट, दूरदर्शन किंवा डिजीटल व्हिडीओ) केला जातो. आधुनिक जगात हलत्या दृष्य सामग्रीसाठी/चित्रफित हा शब्द वापरला जात आहे.

Video चा प्राथमिक अर्थ हा दृश्यांशी संबंधित आहे. आधुनिक संदर्भात Video म्हणजे एखादं चित्रण किंवा चलचित्र जे कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते पडदा, टीव्ही, स्मार्टफोन, संगणकासह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर पाहता येतं. तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंग म्हणजेच दृष्ट व आवाजांचे रेकॉर्डिंग.

Videre म्हणजे काय?

Videre हे लॅटिन भाषेतील एक क्रियापद आहे, पाहणे म्हणजेच लॅटिनमध्ये Videre.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ म्हणजे काय?

व्हिडीओ म्हणजे एक गतिमान चित्रफित किंवा दृश्य सामग्री जी ध्वनीसह किंवा ध्वनीशिवाय रेकॉर्ड केलेली असते. हे सहसा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जसे की टेलिव्हिजन, संगणक, किंवा मोबाइल फोनवर पाहिले जाते. व्हिडीओमध्ये चित्रे, आवाज आणि कधीकधी मजकूर यांचा समावेश असतो, ज्यामुळे माहिती, मनोरंजन किंवा शिक्षणाचे साधन म्हणून त्याचा वापर होतो. उदाहरणार्थ, चित्रपट, व्हिडीओ गेम्स, किंवा यूट्यूबवरील क्लिप्स हे सर्व व्हिडीओचे प्रकार आहेत.