’मला गाडी घ्यायची आहे. माझे बजेट तीन-चार लाखांहून जास्त नाही. मी नवीन कार घ्यावी की जुनी मोठी कार घ्यावी? माझा मासिक प्रवास १०० किमीचा आहे. कृपया गाडी कोणती घ्यावी, ते सुचवा.
– सतीश देवळे
’गाडी नवीन घ्यायची की जुनी हे तुमच्यावर अवलंबून आहे. नवीन गाडीबाबत म्हणाल तर, मी तुम्हाला अल्टो ८०० एलएक्स ही गाडी घेण्याचा सल्ला देईन. तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल, तर स्विफ्ट डिझायर किंवा होंडा सिटी हे दोन चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुमचा महिनाभराचा प्रवास जर १०० किमीचाच असेल तर तुम्ही जुनी गाडी घेतलेलीच बरी.
’नमस्कार! सर, मला गाडी घ्यायची आहे. माझे बजेट दहा लाख रुपये आहे. मला व्यवसायासाठी गाडी घ्यायची आहे. मला गाडीत रीअर एसी हवा आहे तसेच एबीएस सिस्टम हवी आहे. गाडीत ७ ते ८ जण आरामात बसू शकतील व माझे दररोजचे रनिंग १०० ते १५० किलोमीटर आहे, तरी जास्त पिकअप असणारी व कुठलीही तक्रार नसणारी गाडी सुचवा.
– चिंतामणी कुलकर्णी
’सर्वोत्तम आणि आरामदायी कार मिहद्रा झायलो डी४ बीएस (आयव्ही) ही आहे. तिची ऑनरोड किंमत बरोब्बर दहा लाख रुपये आहे. तसेच एसयूव्ही सेगमेंटमधली ती सर्वोत्तम कार आहे. २४०० सीसी सीआरडीई इंजिनाचे मायलेज १३ किमी प्रतिलिटर आहे आणि हायलोड टेकिंग कार म्हणूनही ही गाडी नावाजलेली आहे.
’मला एक सेकंड हँड कार घ्यायची आहे. माझे बजेट दोन ते सवा दोन लाख रुपये आहे. वापर मात्र जास्त नसेल. वीकेंडसाठी हवी आहे. मी कोणती कार घेऊ?
– मयूर के., मुंबई
’दोन ते सवा दोन लाखांत उत्तम पेट्रोल कार घेणे सोयीचे ठरेल. त्यात होंडा ब्रियो, स्विफ्ट या दोन्ही गाडय़ा सहा ते सात वष्रे वापरलेल्या जुन्या घ्याव्यात.
’माझे बजेट दहा लाख रुपये आहे. माझे कुटुंबपण मोठे आहे. कमी मेन्टेनन्स आणि चांगली गाडी असेल ते सांगा. – गोपाळ गावीत, शहापूर
’आठ आसनी सर्वोत्तम आणि आरामदायी गाडी मिहद्रा झायलो आहे. ती घ्या.
’आमचे बजेट साडेचार ते पाच लाख रुपये आहे. आम्हाला पेट्रोल कार घ्यायला आवडेल आणि आमचे रोजचे रिनग पाच किमी व वीकेंडचे रिनग २० किमी आहे. आम्ही मारुती सेलेरिओ किंवा वॅगन आर घेण्याचे ठरवले आहे. कृपया सांगा की, सेलेरिओ कशी आहे? मारुतीचा विक्रीनंतरची सेवा कशी आहे? – योगेश जोशी
’मारुतीची विक्रीनंतरची सेवा चांगली आहे. सेलेरिओ आणि वॅगन आर या दोन्ही गाडय़ांची इंजिने सारखीच आहेत. तुम्हा पाच व्यक्तींना प्रवास करायचा असेल, तर सेलेरिओ ही गाडी चांगली आहे. तुम्हा तीन-चार व्यक्तींना प्रवास करायचा असेल, तर वॅगन आर ही चांगली गाडी आहे. मात्र, किंमत आणि गुणवत्ता यांच्या तुलनेत डॅटसन गो ही गाडी चांगली आहे.
’मला मारुती जिप्सी गाडी घ्यायची आहे. मला जिप्सीविषयी सांगा. – भूषण नांदेडकर
’जिप्सी ही खूप चांगली गाडी आहे. ती फोर व्हील ड्राइव्हमध्येही उपलब्ध आहे. मात्र, ती फक्त पेट्रोल व्हर्जनमध्येच उपलब्ध आहे. जंगल व प्राणिनिरीक्षणसाठी ही गाडी उत्तम आहे. तसेच बर्फाळ परिसरातही ही चांगली चालते. तुम्ही मायलेजबद्दल विचार करत असाल तर तिचा मायलेज ९ किमी प्रतिलिटर आहे. अन्यथा तुम्ही मिहद्रा थारचा विचार करू शकता. ती जिप्सीपेक्षा दणकट आणि प्रशस्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which car to buy