वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते कार्य सुफल संपूर्ण होते असे म्हटले जाते. ही तिथी सोने खरेदीसाठी शुभ मानली जाते. परिणामी अक्षय्य तृतीया सणाचा प्रभाव सोन्याची किंमतीवर (Gold Price) आणि शेअर मार्केटवर (Share Market) होत असल्याचे पाहायला मिळते. जैन धर्मामध्येही या दिवसाला महत्त्व आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मृहूर्तावर व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली अशी असे म्हटले जाते. त्याशिवाय या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतीयेचा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण असतो.Read More
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला वाहन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असून, पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ दुचाकी वगळता…