महापुरुषाविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमात अग्रेषित करणाऱ्या तरुण विरोधात तक्रार नोंदवणाऱ्या तरुणावर अज्ञात तरुणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी  शिरोळ शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला आहे. शहरातून पोलीस संचलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिरोळ येथील महाविद्यालयातील शिक्षण घेणारा निहाल शेख याने थोर पुरुषाविषयक आक्षेपार्ह व्हिडिओ डीपीला ठेवून तो समाज माध्यमात अग्रेषित केला होता. त्याच्यावर शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्याद देणारा स्वानंद पाटील याच्यावर शुक्रवारी रात्री अज्ञातानी चाकू हल्ला केल्याने मोठी दुखापत झाली आहे.

शिरोळ मध्ये संताप

याची माहिती मिळताच शहरातील शेकडो तरुणांनी संताप व्यक्त केला. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी सात वाजेपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शहरातील व्यवहार बंद झाले. तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, बजरंग काळे, भाजपाचे युवा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव, दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे,प्रवीण चुडमुंगे आदींनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

मुस्लीम समाजाची कारवाईची मागणी शिरोळ मुस्लिम समाजाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समाज माध्यमात अपप्रचार करणाऱ्यावर तसेच हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांना दिले. त्यांनी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth who lodged complaint against offensive video against national icon assaulted by unknown persons zws