सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर खेळणार असल्याचे संकेत प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि कर्णधार टिम पेन यांनी दिले आहेत. भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डेव्हिड वॉर्नरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेला डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या कसोटीत पुनरागमनाविषयी उत्सुक आहे. भारताविरोधात कसोटी सामन्यात वॉर्नरची आकडेवारी चांगली आहे. त्यामुळे वॉर्नरला बाद करण्यासाठी भारतीय संघ रणनिती तयार करत आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू वासिम जाफरनं वॉर्नरला कसं बाद करायचं याबाबतची आयडिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी वासिम जाफरनं वॉर्नरला बाद करण्यासाटी यष्टरक्षक ऋषभ पंतला एक सिक्रेट मेसेज दिला आहे. वासिम जाफरनं एक भन्नाट मिम्स ट्विट पंतला मेसेज दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटबाबत वासिम जाफर भन्नाट आयडिया वापरुन मिम्स ट्विट करत असतो. त्यानं वॉर्नरला बाद करण्यासाठीही एका मिम्सद्वारे मेसेज दिला आहे. त्याला डिकोड करणं सहजासहजी शक्य नाही…


जाफरने आपल्या अधिकृत ट्विटरवर चार फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबतच लिहिलेय की, ‘ऋषभ पंतसाठी साधासोपा मेसेज डिकोड करण्यासाठी…. CC: आर अश्विन आणि रविंद्र जडेजा.’ जाफरने या पोस्टद्वारे पंतला म्हटले की, जाडेाजा आणि अश्विनच्या गोलंदाजीदरम्यान यष्टीमागे प्रसिद्ध दक्षिण भारतीय गाणं ‘बुटा बुमा.’ म्हण, ज्यामुळे वॉर्नर क्रीजसोडून बाहेर जाईल. त्याचदरम्यान तू स्टपिंग कर….

दरम्यान, गेल्या वर्षी डेव्हिड वॉर्नरनं आपल्या इंस्टाग्रामवर अनेक टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केले. तो विविध गाण्यावर ताल धरत असल्याचं दिसते. यामध्ये दाक्षिणात्य चित्रपटातील बुटा बुमा या गाण्यावरी त्यानं उत्तम डान्स केला आहे. हाच धागा पकडत जाफरनं पुन्हा एकदा आपल्या कल्पकतेची जाणीव करुन दिली आहे. जाफरचं हे ट्विट चाहत्यांच्या पसतींस पडत असून त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

आणखी वाचा

पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs ind 3rd test match at sydney cricket ground wasim jaffer secret message for rishabh pant r ashwin and ravindra jadeja nck