जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा : श्रीकांतचे आव्हान संपुष्टात; सिंधू पराभूत

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले.

बाली : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला शुक्रवारी जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यातील अखेरच्या साखळी सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र सिंधूने या स्पर्धेची उपांत्य फेरी आधीच गाठलेली आहे. परंतु किदम्बी श्रीकांतला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिला एकेरीतील ‘अ’ गटाच्या लढतीत थायलंडच्या अग्रमानांकित पोर्नपावी चोचुवांगने सिंधूला २१-१२, १९-२१, २१-१४ असे तीन गेममध्ये नमवले. या दोघींनीही ‘अ’ गटातून उपांत्य फेरी गाठली आहे.

पुरुष एकेरीत मलेशियाच्या दुसऱ्या मानांकित ली झी जियाने अनुभवी श्रीकांतला २१-१९, २१-१४ अशी सरळ दोन गेममध्ये धूळ चारली. श्रीकांतला ‘ब’ गटात दोन पराभव पत्करावे लागल्याने त्याला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचेही आव्हान संपुष्टात आले. त्यांनी अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडच्या बिर्च आणि लॉरेन स्मिथ यांच्यावर २१-१९, ९-२१, २१-१४ अशी मात केली. परंतु पहिल्या दोन लढती गमावल्यामुळे त्यांना गटात तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bwf world tour finals kidambi srikanth loses to lee ii jia zws

Next Story
IND vs NZ : विराटचं ‘कमबॅक’ फसलं..! मुंबईत भारताचा कप्तान शून्यावर बाद; ‘असा’ काढला राग; पाहा VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी