सिनसिनाटी : करोना प्रतिबंधात्मक लस न घेतल्याने नोव्हाक जोकोविचला पुढील आठवडय़ात होणाऱ्या सिनसिनाटी खुल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. लस न घेल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश करता येणार नसल्याने न्यूयॉर्क येथे २९ ऑगस्टला होणाऱ्या अमेरिकेन खुल्या टेनिस स्पर्धेतील त्याच्या सहभागाबाबत संभ्रम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

३५ वर्षीय जोकोव्हिचने २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली असून तो राफेल नदालच्या विक्रमापासून अवघ्या एका जेतेपदाने मागे आहे. काही स्पर्धाना मुकावे लागले तरी मी करोनाची लस घेणार नाही, असे जोकोव्हिचने विम्बल्डन स्पर्धेनंतर स्पष्ट केले होते. करोना लस न घेतलेल्या परदेशी नागरिकांना कॅनडा आणि अमेरिकेत प्रवेश निषिद्ध आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cincinnati tournament corona prevention vaccine novak djokovic ysh