IPL 2020मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीला यंदा भारताच्या टी-२० संघात स्थान मिळालं होतं. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच वरुण चक्रवर्तीने दुखापतीमुळे संघातलं आपलं स्थान गमवालं. टीम इंडियाचा खेळाडू तर तो बनला, पण अद्यार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. पण सध्या तो चर्चेत येण्याचं कारण अतिशय सुखद आहे. KKR संघाकडून खेळणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आपली प्रेयसी नेहा खेडेकर हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. चेन्नई येथे वरुणचा विवाहसोहळा पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वरुण चक्रवर्तीच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरुण कार्तिकने चक्रवर्तीला शुभेच्छा देत सोशल मीडियावर वरुणच्या लग्नातील काही फोटो पोस्ट केले आहेत. परंतु, कोलकाता नाईट रायडर्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ अधिक चर्चेचा विषय ठरतो आहे. वरूण हा क्रिकेटपटू असल्याने त्याच्या लग्नात क्रिकेटपटूंची हजेरी असणं स्वाभाविकच आहे. पण त्याच्या लग्नात भर मंडपात चक्क वरूण आणि त्याची पत्नी नेहा यांच्यात क्रिकेटचा खेळ रंगल्याचे दिसून आले.

पाहा मजेशीर व्हिडीओ-

दरम्यान, वरुण बद्दल महत्वाची बाब म्हणजे तो आधी वेगवान गोलंदाजी करत असे. पण त्यानंतर त्याने एका कारणामुळे फिरकी गोलंदाजीला पसंती दिली आणि याच फिरकीच्या जोरावर तो IPL मध्ये कोट्यवधींचा धनी ठरला. १३ व्या वर्षांपासून तो क्रिकेट खेळत होता. पण महाविद्यालयामुळे त्याला क्रिकेट थांबवावे लागले. पदवीचे शिक्षण आणि दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरूवात केली. तेव्हा त्याने वेगवान गोलंदाज म्हणून सुरूवात केली होती. त्यानंतर मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फिरकी गोलंदाजीचा आधार घ्यावा लागला. पण या फिरकीमुळे त्याने भले-भले फलंदाज तंबूत धाडले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comedy video team india spinner varun chakravarthy plays cricket with wife in marriage hall hilarious watch vjb