लुसान : भारताची ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकाने चौथ्या फेरीत नॅना झागनिद्झे हिचा पराभव करत फिडे महिला ग्रां. प्रि. बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या हरिकाने चार फेऱ्यांअखेर तीन गुणांनिशी रशियाची अलेक्झांड्रा गोऱ्याचकिना हिच्यासह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले आहे. क्विन पॉन डावानुसार सामन्याची सुरुवात करत हरिकाने आपल्या जॉर्जियाच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध निर्विवाद वर्चस्व गाजवले. नॅनाने केलेल्या चुकांचा फायदा उठवत हरिकाने २५व्या चालीलाच विजय संपादन केला. आता हरिकाची पाचव्या फेरीत गाठ २१ वर्षीय गोऱ्याचकिना हिच्याशी पडेल.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-03-2020 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dronavalli harika record second victory in fide womens grand prix zws