भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यातील हा व्हिडिओ आहे. हा सामना भारताने १७ चेंडू आणि ७ गडी राखून जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना आज रविवारी धर्मशाला येथे खेळवला जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आपल्या सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये कॉफी पिताना दिसत आहे. आपला फोटो कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे ‘हिटमॅन’ला कळताच त्याने कॅमेरामनकडे पाहिले आणि त्याला कॉफी पाहिजे का असे विचारले.
हेही वाचा – रोहित ब्रिगेडचा मराठी बाणा..! मुंबई इंडियन्सनं ‘खास’ शैलीत दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
या विजयासह भारतीय संघाने गतवर्षी श्रीलंकेतील टी-२० मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला. भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील हा सलग ११वा विजय आहे. यादरम्यान संघाने घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीजचा ३-० असा पराभव केला.