कनिष्ठ डेव्हिस चषक स्पर्धा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कनिष्ठ डेव्हिस चषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून पराभूत झालेल्या भारतीय संघाने इंडोनेशियाला ३-० असे पराभूत केले. अजय मलिकने एकेरी आणि दुहेरी टेनिसच्या दोन्ही सामन्यात बाजी मारत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

भारताच्या अजयने एकेरी इंडोनेशियाच्या मोहगुनवान त्रिसमुवांतरा याच्यावर ६-४,६-२ अशी मात केली. त्यानंतर सुशांत डबास याने भारताच्या दुसरा एकेरी सामना जिंकला. तर दुहेरीत अजय आणि दिवेश गेहलोत यांनी अगातरा आणि लकी कुरनिआवान या जोडीचा ६-७, ६-२, १०-४ असे पराभूत करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताला आता पुढील लढतीत ऑस्ट्रेलियाशी झुंजावे लागणार असून ऑस्ट्रेलिया हा गटातील सर्वाधिक मजबूत संघ मानला जातो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India defeated indonesia