पंजाब विरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ स्वस्तात बाद झाला पण शिखर धवनने आपली लय कायम राखत धमाकेदार शतक ठोकलं. सुरूवातीला श्रेयस अय्यर, मग ऋषभ पंत आणि नंतर मार्कस स्टॉयनीस यांच्यासोबत भागीदारी करत शिखर धवनने शतक पूर्ण केलं. यंदाच्या हंगामात आणि IPL कारकिर्दीत त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं. गेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईविरूद्ध त्याने नाबाद १०१ धावांची खेळी केली होती. याचसोबत IPLमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा शिखर धवन पहिलावहिला खेळाडू ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचा बळी लवकर गमावला. एका चौकारासह ७ धावा काढून तो बाद झाला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक १४ धावांवर माघारी परतले. मार्कस स्टॉयनीसदेखील ९ धावांवर बाद झाला. पण धवनने मात्र एक बाजू लावून धरली आणि अप्रतिम शतक लगावले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan first ever cricketer to score 2 consecutive centuries in ipl history most hundreds ipl 2020 dc vs kxip vjb