भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी नुकतीच प्रसिद्ध कॉफी विथ करण या शोवर हजेरी लावली. कार्यक्रमाचे सहावे पर्व सध्या सुरु असून यामध्ये सहभागी झालेल्या हार्दिकला त्याने केलेल्या वक्तव्यांसाठी नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. विराट कोहली हा सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला फलंदाज आहे असं म्हणणाऱ्या हार्दिकला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. मात्र त्याचबरोबर क्रिकेटसंदर्भातील अनेक प्रश्नांवर हार्दिकने दिलेली उद्धट आणि टोकाची उत्तरे अनेकांना रुचली नसून त्यावरूनही त्यांनी हार्दिकवर टिका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करणने या दोघांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने माझे कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल माझ्याशी चर्चा करतात असे उत्तर दिली. तसेच एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या कोणत्या मुलीबरोबर माझा सीन झाला होता असं त्यांनी मला विचारलं. त्यावेळी मी अनेक मुलींकडे बोटे दाखवून त्यांना सांगितले होते असंही हार्दिक या कार्यक्रमामध्ये म्हणाला. त्याचप्रमाणे आपलं कौमार्य गमावल्याबद्दलही त्याने आपल्या पालकांना अगदी कूलपणे सांगितल्याचं करणला सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी करुन आलो’ एवढचं सांगितल्याचं हार्दिक म्हणाला.

हार्दिकच्या या नको तितक्या खुलेपणावर नेटकरी चांगलेच संतापले असून त्यांनी हार्दिकला खडेबोल सुनावले आहेत. महिलांबद्दल केलेली वक्तव्य चुकीची असून हार्दिकला कूल असणे आणि मुर्खपणा करणे यातील पुसटशी सिमा समजली नसल्याची टिका अनेकांनी केली आहे. महिलांबद्दल अशी मते असणारा खेळाडू राष्ट्रीय संघात असणे खरचं दुख:द गोष्ट आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात काय आहे नेटकऱ्यांचे म्हणणे…

खेदजनक आहे हे

क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटले जायचे

पैश्याने शिष्टाचार विकत घेता येत नाही

कोणीतरी हार्दिकला हे सांगा

वाईट याचं वाटतं की तो राष्ट्रीय संघात आहे

महिलांबद्दलचे मत धक्कादायक

जपून शब्द वापरायला हवे होते

मुलाखत पाहिली असेल तर हा आहे उतारा

नववी नापास असल्याचं त्याने दाखवून दिलं

तिचं बोलणं काय मनावर घ्यायचं

बीसीसीआयने हार्दिकला शिकायला हवं

महिलांशी कसे वागावे हेही शिकवा

राष्ट्रीय संघात खेळणाऱ्यासाठी योग्य नाही

हार्दिक पांड्या ओव्हरेटेड

हा स्वत:ला समजोत काय

एकंदरितच हार्दिकने दिलेली उत्तर नेटकऱ्यांना अजिबातच पटलेली दिसत नाहीत. सर्वांनीच हार्दिकने महिलांशी कसे वागावे हे शिकणे गरजचे असल्याचे मत नोंदवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koffee with karan twitter bashes hardik pandya for misogynistic statements