के एल राहुल आणि मनिष पांडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यग्र असल्यामुळे यंदा कर्नाटक प्रीमियर लिगला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. मात्र, सध्या या स्पर्धेच्या निमित्ताने स्टुअर्ट बिन्नी आणि त्याची पत्नी मयंती लँगर यांच्या मैदानातील ‘पहिल्या भेटी’ची जोरदार चर्चा रंगली आहे. या स्पर्धेत शुक्रवारी बेळगाव पँथर्स आणि बंगळुरू ब्लास्टर्स यांच्यात सामना झाला. बेळगाव पँथर्सकडून मैदानात उतरलेल्या स्टूअर्ट बिन्नीने बंगळुरु ब्लास्टर्सविरुद्ध ४६ चेंडूत ८७ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीच्या जोरावर बेळगाव पँथर्सने हा सामना जिंकला. या सामन्यात बिन्नीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यावेळी त्याची पत्नी मयंती हिने त्याची मुलाखत घेतली. क्रिकेटच्या मैदानात पत्नीने पतीची मुलाखत घेण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही होता. त्यामुळेच मयंतीसोबत बोलताना बिन्नी म्हणाला की, खासगी कारणांसाठी देखील माझ्यासाठी आजचा दिवस खास आहे. या सामन्यानंतर बिन्नीने इन्साग्राम अकाउंटवरुन पत्नी मयंतीसोबतचा एक फोटो देखील शेअर केला होता. या फोटोला अनेक लाईक्स मिळाले आहेत. ‘आज तुझ्यासोबत क्रिकेटच्या मैदानावर घालवलेला क्षण खास असाच आहे. क्रिकेटमुळेच आपण एकत्र आलो आहोत’, अशी शब्दात बिन्नीने पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayanti langer interviews husband stuart binny on marrige anniversary