ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने सराव सुरू केल्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे व ते आता अधिक जोमाने सराव करू लागले आहेत. क्लार्क याचा आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र तो सामना खेळण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. २१ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या सामन्यात बांगलादेश संघाशी गाठ पडणार आहे. या सामन्यात तो खेळू शकेल अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियन संघाचे फिजिओ अ‍ॅलेक्स कोन्टोरीस म्हणाले, त्याच्यावर नियमित उपचार सुरू असून तो आता फलंदाजीचा सराव करू लागला आहे’.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael clarke continues to practice