ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरच्या चाहत्यांसाठी धक्कादायक वृत्त आहे. नेमार ज्युनिअरवर पॅरिसमध्ये एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्काराचा आरोपात तथ्य नसल्याचे नेमारचे वडिल आणि मॅनेजरने सांगितले आहे. ब्लॅकमेल करुन पैसे उखळण्यासाठी हा आरोप केल्याचं नेमारच्या वडिलांचे म्हणणं आहे. साओ पाउलो पोलिसांत नेमारविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये फुटबॉलपटू नेमार याने दारूच्या नशेत मारहाण करून बलात्कार केल्याचा आरोप एका महिलने केला आहे. ब्राझीलमधील स्थानिक संकेतस्थळ यूओएलकडे महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीची प्रत आहे. त्यानुसार, १५ मे रोजी पॅरिसमधील हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. नेमारनं दारूच्या नशेत महिलेला मारहाण केली आणि बलात्कार केला. त्यानंतर दोन दिवसांनी ती महिला ब्राझीलला गेली.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पीडित महिला ब्राझीलची आहे. सोशल मीडियावरून नेमार आणि त्या महिलेची ओळख झाली होती. सोशल मीडियावर दोघांमध्ये संवाद होत होता. त्यावेळी नेमारनं दिला पॅरिसमध्ये भेटण्याचे सांगितलं. त्यांच्या ठरल्यानुसार, पीडित महिला पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्यावेळी दारुच्या नशेत नेमार हॉटेलमध्ये महिल्याचे रूमध्ये आला. तिथे दोघांमध्ये गप्पा-गोष्टी झाल्या. त्यानंतर नेमारनं मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप आहे.

बलात्कार आणि मारहाणीच्या आरोपाचं नेमारच्या वडिलांनी खंडन केलं आहे. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि ते वकिलांकडे दिलेले आहेत, असे त्यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neymar accused of raping a woman in paris