लिएण्डर पेस (भारत) व रॅडीक स्टेपानेक (चेक प्रजासत्ताक) यांना विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेतील पहिल्या फेरीत डॅनिएली ब्रासिअली व जोनाथन एरलिच या इटलीच्या जोडीचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे. सोमवारी या स्पर्धेला सुरुवात होत आहे.
भारताच्या पुरव राजा व दिविज शरण यांना या स्पर्धेतील पदार्पणात निकोलस मोनरोई (अमेरिका) व सिमोन स्टॅडलर (जर्मनी) यांच्याशी खेळावे लागणार आहे. जर हा सामना भारतीय जोडीने जिंकला तर त्यांना भारताचा महेश भूपती व त्याचा ऑस्ट्रियन सहकारी ज्युलियन नॉवले यांच्याविरुद्ध खेळावे लागेल. भूपती व नॉवले यांना पहिल्या लढतीत लिओनाडरे मेयर (अर्जेटिना) व अल्बर्ट रामोस (स्पेन) यांच्याशी झुंजावे लागणार आहे. भारताचा रोहन बोपण्णा व त्याचा फ्रेंच सहकारी एडवर्ड रॉजर व्हॅसेलिन यांची जाकरे नेमीनेन (फिनलंड) व दिमित्री तुर्सुनोव्ह (रशिया) यांच्याशी गाठ पडणार आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paes stepanek face bracciali erlich in wimbledon opener