आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने कर्णधार टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाने त्यांचे दिग्गज खेळाडू या स्पर्धेसाठी निवडले नाहीत. संघाच्या अलीकडील खराब कामगिरीमुळे इतक्या मोठ्या स्पर्धेत या दिग्गज खेळाडूंच्या पुनरागमनाची सर्वांनाच अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीरने संघात निवड न झाल्याने निराशा व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्यतिरिक्त, ताहीरने असेही उघड केले की जेव्हा माजी खेळाडू मार्क बाउचर प्रशिक्षक बनले तेव्हापासून त्याने त्याच्याशी एकदाही संपर्क साधला नाही. गेल्या १८ महिन्यांतील कामगिरीच्या आधारावर संघात स्थान द्यायला हवे होते, असे ताहीरला वाटते.

ताहीर म्हणतो, ”वर्ल्डकप संघात न घेतल्यामुळे मी दु: खी आहे. मी १० वर्षे देशाची सेवा केली, त्यामुळे मला वाटते की मी काही सन्मानास पात्र आहे, कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही, माझ्या भविष्यातील योजना काय आहेत, हे सांगण्यासाठीही संपर्क केला नाही. मी माझ्या देशासाठी मनापासून खेळलो आहे.”

हेही वाचा – अरे बापरे..! टीम इंडियाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरचं संभाषण लीक; दुसरा मेसेज होता धक्कादायक!

ताहीर म्हणाला, ”माझे संपूर्ण कुटुंब दक्षिण आफ्रिकन आहे. या देशाने मला दिलेल्या संधींसाठी मला वर्ल्डकप जिंकून तुमचे आभार मानायचे आहेत. म्हणूनच मी निवृत्त होण्याचा विचार करत नाही आणि जर मला वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत खेळायचे असेल तर मी खेळणार आहे.”

टी-२० वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, ब्योर्न फॉर्च्यून, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्क्राम, डेव्हिड मिलर, वियान मुलडर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्किया, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, रुसी व्हॅन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africas legendary bowler imran tahir gave big reaction after t20 world cup team announced adn