द अंडरटेकर हा WWE मधील सर्वात खतरनाक फायटर म्हणून ओळखला जातो. परंतु ब्रॉक लेसनर, गोल्ड बर्ग, स्टोन कोल्ड, जॉन सीना यांसारख्या अनेकांना पाणी पाजणाऱ्या या अंडरटेकला खरे आव्हान दिले भारतीय रेसलर द ग्रेट खली याने. आता याच द ग्रेट खलीला जगातील सर्वात उंच रेसलर आव्हान देत आहे. हा रेसलर भारतीय असून त्याचे नाव सुनील कुमार आहे. त्याला ‘द ग्रेट अंगार’ या टोपण नावाने ओळखले जाते. ७ फूट १ इंच उंच असलेला द ग्रेट खली आपल्या अजस्र उंचीसाठी रेसलींग विश्वात ओळखला जातो. मात्र, द ग्रेट अंगारची उंची खली पेक्षाही जास्त आहे. त्याची उंची तबब्ल ७ फूट ६ इंच आहे. सध्या त्याला WWE मध्ये सर्वात उंच रेसलर म्हणून ओळखले जातेय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ डिसेंबर १९९० साली जन्मलेला सुनील कुमार जम्मूचा रहिवासी आहे. त्याचे वडिल भारतीय सैन्य दलात होते त्यामूळे त्यालाही सैन्यदलात भरती होऊन भारत देशासाठी काहीतरी करुन दाखवण्याची स्वप्ने पडत. परंतू १५० किलोपेक्षा जास्त वजन व अभ्यासात फारशी गती नसल्यामूळे सुनिल सैनिकी परिक्षांत नापास झाला.

दरम्यान खूप जास्त उंची असल्यामूळे रेसल स्क्वेअरचे संस्थापक विनायक सोढी यांचे लक्ष सुनील कुमारवर गेले. त्यांनी सुनीलला रेसलींग करण्याचा सल्ला दिला.अथक परिश्रम व विनायक सोढींच्या मार्गदर्शनाने सुनील एक परिपक्व रेसलर बनला. त्यानंतर त्याने WWE च्या पात्रता फेरित धडक मारली. WWE मूळे आता संपूर्ण जगात सनील कुमारची चर्चा होऊ लागली आहे. त्यामूळे आता लवकरच द ग्रेट अंगार WWE रिंगमध्ये अमेरिकन फायटर्सची धुलाई करताना दिसेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil kumar in wwe who tallest than the great khali