भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी करोना पीडितांना मदत करण्यासाठी निधीची स्थापना केली होती. सात दिवसात सात कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, परंतु हे लक्ष्य आधीच पूर्ण झाल्याने लक्ष्याची रक्कम ११ कोटी इतकी करण्यात आली. आता हे लक्ष्यही पूर्ण झाले आहे. त्यामुळे विराट आणि अनुष्का हे दोघेही भारावून गेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट आणि अनुष्काने स्वत: दोन कोटी रुपयांच्या देणगीने हा निधी सुरू केला होता. निधी जमा झाल्यानंतर विराटने एक ट्वीट करत या रकमेची माहिती चाहत्यांसमवेत शेअर केली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लॉकडाउन दरम्यान विराट आणि अनुष्कानेही पीएम केअर फंडमध्ये देणगी दिली होती. आता यावेळी देखील दोघांनी एक स्तुत्य काम केले आहे.

 

ट्विटरवर माहिती देताना विराट म्हणाला, ”आपले लक्ष्य एकदा नव्हे तर दोनदा ओलांडले गेले आहे. आणि ही भावना सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. मला देणगी देणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. आपण या काळात एकत्र आहोत आणि आपण जिंकू.”

विराटच्या उपक्रमावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli overwhelmed by raising big amount in fund for corona patient adn