मिहान-सेझ प्रकल्पासाठी शिवणगाव येथील जमीन संपादित करून २००८ मध्ये मोबदला देण्यास प्रारंभ झाला.
मोक्का आणि इतर कायद्यातील गुन्हेगारांना हा खासगी डबा मिळत नाही.
महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबईसह काही भागात दमट वातावरणामुळे कूलरचा वापर होतांना दिसत नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मार्च २०१३मध्ये भूमिपूजन करण्यात आले होते.
अलीकडच्या काळात वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी बैठकांसाठी हॉटेलचाच पर्याय निवडला आहे
विविध शैक्षणिक संघटनांच्या व्यासपीठांवर भाजपप्रणीत संस्थांचे कार्यक्रम होऊ लागले.
नव्या निर्णयानुसार दिवसभरातून तीन वेळा होणाऱ्या सरकारी पूजेसाठी पूजाऱ्यांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जाईल.
तालुका अथवा जिल्ह्यातील केंद्रात बालकांना उपचारासाठी नेणे संबंधित कुटुंबीयांना आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही.
एक एकर लागवडीसाठी बटाटय़ाचे ५०० किलो बेणे कृषी विज्ञान केंद्रामार्फत पुरविण्यात आले.
विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर मंडळाने आमच्या मानधनात कपात करण्याचा निर्णय घेतला.
गंगापूर धरणाने तळ गाठल्यामुळे कित्येक महिन्यांपासून नदीपात्रातून पाणी सोडणे बंद झाले आहे.
शहरात आणि माझ्या प्रभागात होत असलेल्या रस्ते खोदाईच्या विरोधात मी सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच माझ्या प्रभागातील रस्ते खोदण्यात येत आहेत.