‘बेरी’ म्हणजेच छोटय़ा आकाराची आंबट-चिंबट फळे. लहानांपासून थोरांना आवडणाऱ्या बेरीमधील एक प्रकार म्हणजे ब्लूबेरी. या ब्लूबेरीच्या वापराने अनेक फायदे होतात. त्यापैकी एक म्हणजे मेंदूचे कार्य उत्तम गतीने चालण्यासाठी आणि त्याचा विकास होण्यासाठी ब्लूबेरीचा रस आरोग्यदायक ठरतो, असे संशोधन नुकतेच समोर आले आहे. या संशोधनानुसार वृद्ध  माणसांमध्ये हे अधिक फायद्याचे ठरते.  ब्लूबेरीमध्ये अनेक गुणयुक्त घटके असतात ज्यामुळे मेंदूतील क्रियाप्रतिक्रियाविषयक कामे अधिक वेगाने होतात. वृद्धापकाळात मेंदू व स्मरणशक्तीशी संबधित अनेक विकार उद्भवतात त्यावर उपाय म्हणून शाकाहरी विशेषत: वनस्पतींच्या गुणधर्मानीयुक्त असे अन्न सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ब्लूबेरीचा साठवणूक केलेला रस चांगला असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या अभ्यासानुसार १२ आठवडय़ांत दररोज ३० मिली ब्लूबेरीचा रस पिणे मेंदूच्या कार्याची क्षमता वाढविण्यास मदत करते. २६ जणांवर याबाबत संशोधन करण्यात आले. १२ आठवडे दर दिवशी सर्वाना २३० ग्रॅम ब्लूबेरीचा रस देण्यात आला. अनेक चाचण्या आणि एमआरआय चाचण्यांमधून गेल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रक्ताभिसरण अधिक उत्तम पद्धतीने होत असल्याचे संशोधन समोर आले. यावरून ब्लूबेरीचे मेंदूसाठी असणारे अनेक फायदे अधोरेखित होण्यास मदत झाली.

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blueberry brain