Chanakya Niti In Marathi : चाणक्य नीतिमध्ये मानव समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती आपल्या जीवनात या धोरणांचा अवलंब करतो त्याला कधीच कोणती समस्या येत नाही. चाणक्य नीतिमध्ये जीवनाचा मार्ग सांगितला आहे. बहुतेक लोकांची सवय असते की ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टीही इतरांसोबत शेअर करतात. पण काही वेळा या सवयीमुळे त्यांना समस्यांनाही सामोरे जावे लागते. जाणून घ्या चाणक्य नीतिमध्ये अशा कोणत्या पाच गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या आपण कोणाशीही शेअर करू नये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थनाश मनस्तापं गृहिण्याश्चरितानि च।
नीचं वाक्यं चापमानं मतिमान्न प्रकाशयेत॥

चाणक्य नीतीच्या या श्लोकात सांगितले आहे की, आपल्या धन हानीबाबत, मनातलं कोणतंही दु:ख, पतीच्या वागणुकीबद्दल, एखाद्याकडून अपमानित झाल्याबद्दल, कुटुंबाबद्दल कोणत्याही वैयक्तिक गोष्टी कोणासोबतच शेअर करू नयेत. कारण जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, ते तुमच्या या गोष्टींची खिल्ली उडवू शकतात किंवा ते तुमचा गैरफायदाही घेऊ शकतात.

चाणक्य नीतिमध्ये असं सांगण्यात आलंय की, लोक त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सांगतात. कारण त्यामुळे त्यांच्या मनाला हलकं वाटतं. पण असे काही लोक असतात जे तुमचे बोलणे ऐकून समोरून तुमचे सांत्वन करतात. पण पाठीमागे त्याची चेष्टा करण्यापासून मागे हटत नाहीत. कदाचित ते तुमची गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी सांगायलाही मागे पुढे विचार करणार नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : Wedding Fashion Tips : नवरीसाठी हे पाच स्टायलिश ‘ब्रायडल फुटवेअर’ ; पायाचे सौंदर्य नक्कीच वाढेल

आचार्य चाणक्य सांगतात की, तुझी स्थिती कशी आहे हे कोणाला सांगू नका. कारण तुमची परिस्थिती जाणून लोक तुमची साथ सोडू शकतात. त्याचप्रमाणे कोणत्याही पतीने आपल्या पत्नीबद्दल कोणालाही सांगू नये. उदाहरणार्थ, पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर अशा गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. कारण कदाचित तुमचे तुमच्या पत्नीसोबतचे संबंध चांगले असतील, पण तुमच्या जोडीदारासमोर दुसरा कधीही तुम्ही सांगितलेली गोष्ट बोलेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही.

आणखी वाचा : Year 2022 Horoscope: ‘या’ दोन राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो…

जर कोणी तुम्हाला चांगले किंवा वाईट म्हटले असेल किंवा तुमचा अपमान केला असेल तर ही गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. कारण हे ऐकून समोरची व्यक्ती तुमची चेष्टा करू शकते. तुमच्या कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर त्याची माहिती इतरांना देऊ नका. कारण समोरची व्यक्ती तुमच्या या गोष्टीचा फायदा घेऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti do not share these 5 things with anyone otherwise you may get into trouble prp