‘अंड्यांमधून आपल्याला भरपूर प्रथिने मिळतात’, ‘अंडी आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात…’ असे अंडी खाण्याचे हजारो सल्ले देणारी बरीच मंडळी असतात. मात्र, ती खाल्ल्यानंतर, त्यांच्या सालांच्या होणाऱ्या उपयोगांबद्दल मात्र फार कुणी सांगत नाही. असे असले तरी आज आपण अंड्यांच्या सोललेल्या कवचांचे नेमके किती आणि कोणकोणते फायदे होऊ शकतात ते पाहणार आहोत. या उपयोगांची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका लेखामध्ये दिलेली आहे. त्या माहितीमध्ये नेमके काय आहे जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंड्याच्या कवचांचे पाच उपयोग

१. पक्ष्यांसाठी खाद्य

अंड्याचे कवच कचऱ्याच्या पेटीत फेकून देण्याऐवजी त्यांचे लहान लहान तुकडे करून घ्या. आता या बारीक तुकड्यांचा वापर आपण पक्ष्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात हे तुकडे पसरून ठेवा. अंड्याच्या कवाचामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने ते पक्ष्यांसाठी उत्तम आणि पौष्टिक खाद्य ठरू शकते.

हेही वाचा : Garden tips : गणपती बाप्पाला आवडणाऱ्या दुर्वा घरी कशा उगवायच्या? पाहा ही सोपी हॅक

२. सांधेदुखीसाठी उपयुक्त

सांधेदुखी म्हणजे फारच त्रासदायक प्रकार. परंतु, अंड्याच्या सालांचा वापर करून आपणाला ही सांधेदुखी काही प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे समजते. त्यासाठी या सालांचा उपयोग कसा करावा ते पाहा.
सर्वप्रथम अंड्यांच्या कवचांचे बारीक तुकडे करून, एका ग्लास किंवा बाटलीत भरून, त्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर घालून घ्या.
हे मिश्रण चांगले दोन दिवस तसेच ठेवा. दोन दिवसांत ग्लासातील अंड्यांचे तुकडे व्हिनेगरमध्ये विरघळून जातील.
आता ग्लासामधील मिश्रण सांध्यांना लावून छान मसाज करावा.
व्हिनेगर आणि अंड्याच्या सालांमधील सर्व पोषक आणि उपयुक्त घटक या मिश्रणात असल्याने सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत मिळते.

३. चिवट डाग स्वच्छ करण्यासाठी

चिवट डाग नैसर्गिक पद्धतीने काढण्यासाठी अंड्याच्या कवचांचा वापर करता येऊ शकतो.
त्यासाठी अंड्याची साले स्वच्छ करून, वाळवून त्याची पावडर करून साठवून ठेवावी.
जमीन, टेबल किंवा कोणत्याही पृष्ठभागावरील चिवट डागांवर ही पावडर टाकून एखाद्या स्पंजच्या मदतीने डाग घासून काढावेत.
अंड्यांच्या सालांमध्ये असे घटक शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे रसायने असणारे उत्पादन न वापरता, पृष्ठभागावरील डाग सहज काढण्यासाठी ही ट्रिक उपयुक्त ठरू शकते.

हेही वाचा : Beauty tips : तूप, बदाम अन्….; काय आहे घरगुती काजळ बनवण्याची पारंपरिक ट्रिक, जाणून घ्या

४. नैसर्गिक खत

घरातील बाल्कनीत किंवा अंगणात अनेकांना बागकाम करण्याची वा सुंदर रोपे लावायची आवड असते. मात्र, त्या रोपांची उत्तम काळजी घेण्यासाठी, त्यांना वेळोवेळी खत घालणे आवश्यक असते. त्यासाठी अंड्यांच्या कवचांचा वापर करून तुम्ही घरात अगदी सोप्या पद्धतीने चांगल्या प्रतिचे खत बनवू शकता.
त्यासाठी अंड्याची साले पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्या.
आता त्याचे बारीक तुकडे करून कुंड्या किंवा बागेमध्ये घालून ठेवा.
मातीमध्ये अंड्यांच्या तुकड्यांचे हळूहळू विघटन होऊन, त्यामुळे रोपांना कॅल्शियम, खनिजे व इतर पोषक घटक मिळतात.
त्यामुळे अशा नैसर्गिक खताचा वापर करून, तुमच्या बागेतील रोपांचे उत्तम पोषण करता येऊ शकते.

५. अंड्याच्या कवचांची कॉफी

अनेक जण कॉफीची चव वाढविण्यासाठी तसेच, त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी कॉफीमध्ये अंड्यांच्या कवचांचा वापर करतात. तुम्हालादेखील कॉफीची चव वाढविण्यासाठी हा प्रयोग करून बघायचा असल्यास काय करायचे ते पाहा.

सर्वप्रथम अंड्याची साले नीट धुऊन घ्या. त्यामध्ये बलकाचा कोणताही अंश राहू देऊ नका.
त्याचे बारीक तुकडे तयार होणाऱ्या कॉफीमध्ये घालावेत.
त्यामुळे कॉफीचे बारीक कण कपाच्या तळाशी बसण्यास मदत होते; तसेच यामुळे कॉफीची चवही वाढते.

आता पुढच्या वेळेस अंडी खाऊन झाल्यानंतर त्याचे कवच कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्यापेक्षा असे काहीतरी भन्नाट उपाय नक्कीच करून पाहू शकता.

[टीप – वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.]