वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा शुभ ग्रह मानला जातो. त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक सुख प्राप्त होते. जीवनात धन आणि कीर्ती शुक्राच्या प्रभावानेच मिळते. शुक्र हा वृषभ आणि तूळ राशीचा शासक ग्रह आहे. त्यामुळे या दोन राशीच्या लोकांवर शुक्राची कृपा आहे. या राशीच्या लोकांना जीवनातील सर्व भौतिक सुखे मिळतात. त्यांच्याकडे पैसे आणि अन्नाची कमतरता कधीच नसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर या राशीचे लोक खूप व्यवहारी असतात. त्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ठरवलेली काम पूर्ण करूनच दम मिळवता. तुमच्यात एक विलक्षण आकर्षण असते, ज्यामुळे इतर तुमच्याकडे लवकर आकर्षित होतात. इतर लोकांनी केलेल्या कामाचे तुम्ही खूप कौतुक कराल. ज्या क्षेत्रात तुम्ही प्रामाणिक मनाने काम करता त्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळते. तुमच्या आयुष्यात सुख-सुविधांची कधीच कमतरता नसते.

आणखी वाचा : शनीचे कुंभमध्ये होणार संक्रमण, ‘या’ ४ राशीच्या लोकांसाठी धन- धान्यात वाढ होऊ शकते वृद्धि!

तूळ राशी (Libra)

तूळ राशीचे लोक खूप सामाजिक, आनंदी मूड आणि मोहक व्यक्तिमत्त्व आहेत. ते आपल्या वागण्याने सर्वांची मने जिंकतात. त्यांना महागड्या वस्तूंची आवड असते. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते पटकन हार मानत नाहीत. आव्हानांना तोंड देत ते यश मिळवतात. त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते. पैशाच्या बाबतीत ते खूप भाग्यवान मानले जातात.

आणखी वाचा : Astrology 2022: राशीनुसार ‘या’ सवयी बदलल्या नाहीतर होईल नुकसान

ज्योतिष शास्त्रात शुक्र: मीन राशीमध्ये शुक्र उच्च असेल तर कन्या राशीला त्याचे दुर्बल चिन्ह म्हणतात. २७ नक्षत्रांपैकी भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाध नक्षत्रांचा मालकी हक्क त्याच्याकडे आहे. बुध आणि शनि हे शुक्राचे अनुकूल ग्रह आहेत आणि सूर्य आणि चंद्र हे शत्रू ग्रह मानले जातात. शुक्राचा संक्रमण कालावधी २३ दिवसांचा आहे. कुंडलीत शुक्र बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात भौतिक सुखे मिळतात, अशा लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the influence of venus there is no shortage of money in the lives of people of these two zodiac signs they are adept at making money dcp