चिनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Honor ने भारतात आज आपले दोन नवे स्मार्टफोन Honor 20 प्रो आणि Honor 20 लाँच केले आहेत. नवी दिल्लीमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कंपनीने हे दोन स्मार्टफोन लाँच केले. भारताआधी कंपनीने हे दोन्ही फोन युरोपात लाँच केले होते. जाणून घेऊया फीचर्स आणि किंमत –

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Honor 20 प्रो स्पेसिफिकेशन्स –
अनेक प्रीमियम फीचर्स या स्मार्टफोनमध्ये आहेत. 6.26 इंच फुल एचडी+ डिस्प्ले यात असून फोनमध्ये 91.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आहे. 8जीबी रॅम आणि 256जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटमधील या फोनमध्ये 7 एनएम किरिन 980 प्रोसेसर आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पायवर आधारीत मॅजिक युआय 2.1.0 वर कार्यरत असेल.

या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यातील कॅमेरा सेटअप. फोनच्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल, दुसरा 16 मेगापिक्सल (सुपर वाइड अँगल) , तिसरा 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि चौथा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 3-डी पोर्ट्रेट लाइटनिंग सपोर्ट फीचर यामध्ये आहे. या फोनमध्ये 4,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कमी वेळेत चार्ज व्हावा यासाठी फोनमध्ये 22.5 वॉट क्षमतेचं ऑनर सुपर चार्ज तंत्रज्ञान आहे.

ऑनर 20 चे स्पेसिफिकेशन्स –
ऑनर 20 प्रो प्रमाणेच ऑनर 20 मध्येही क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यात सोनी आयएमएक्स 586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, त्यासोबत 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग सेंसर आणि मॅक्रो लेंससोबत एक 2 मेगापिक्सल कॅमेरा. सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ऑनर 20 मध्ये 6.26 इंच फुल एचडी+ पंच होल डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 9 पायवर आधारीत मॅजिक युआय 2.1.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 7nm Kirin 980 AI प्रोसेसर आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या या फोनला मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट देण्यात आलेला नाहीये. फोनमध्ये 3,750mAh ची बॅटरी देण्यात आली असून कमी वेळेत चार्ज व्हावा यासाठी यात 22.5 वॉट क्षमतेचं ऑनर सुपर चार्ज तंत्रज्ञान आहे.

किंमत –
Honor 20 Pro च्या 8जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर Honor 20 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honor 20 pro and honor 20 launched in india know all the features and price sas