शूजमधून वास येणे ही एक सामन्य गोष्ट आहे. सगळ्यांच्याच नाही पण बहुतेक लोकांच्या शूजमधून खूप दुर्गंधी येते. जी त्यांच्या शेजारी बसलेल्या व्य्तीला अजिबात सहन होत नाही. यामुळे अनेकांना लाजिरवाण्या परिस्थितीतून जावे लागते. विशेषत: ऑफिस, कॉलेजमध्ये असताना अशाप्रकारे आपल्या शूजमधून दुर्गंधी येऊ लागली की, अनेकजण खिल्ली उडवू लागतात. पण शूजची योग्य काळजी घेऊनही समस्येपासून सुटका होत नाही. यासाठी खाली दिलेल्या टिप्स वापरुन तुम्ही शूजमधील दुर्गंधी टाळू शकता.
शूजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
१) शूज आणि इनसोल्स धुवा
शूजमधून खूप दुर्गंधी येत असल्यास शूज आणि इनसोल नियमितपणे स्वच्छ धुवून ध्या. शूजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी थंड पाणी हा उत्तम उपाय आहे.
२) शूज नेहमी थंड, हवेशीर जागी ठेवा
ज्या लोकांच्या शूजमधून दुर्गंधी येते त्यांनी आपले शूज थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवावे. त्यामुळे बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि शूज दुर्गंधीयुक्त होण्यापासून वाचतात.
३) पायांवर डिओडोरंट स्प्रे करा
पायांना येणाऱ्या घामामुळे शूज ओले होतात.पण तुमचे पाय कोरडे राहिल्यास बॅक्टेरिया वाढू शकणार नाहीत. अशा स्थितीत पायांवर डिओडोरंट स्प्रे करा. यामुळे बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
४) घाम शोषून घेणारे सुती कापडाचे मोजे वापरा
काही मोजे घाम शोषण्यास सक्षम नसतात. अशावेळी शूजमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून तुम्ही घाम शोषणारे चांगल्या सुती कापडाचे मोजे घालणे हा एक चांगला पर्याय आहे. हे मोजे बाजारात सहज उपलब्ध आहेत. असे मोजे घाम फार लवकर शोषून घेतात आणि बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करतात.
५) वॉशेबल इनसोल्सची निवड करा
तुम्ही वॉशेबल इनसोल वापरून पाहू शकता. हे टेरी कॉटनने बनवलेले असतात आणि त्यांचा सोल रबर लेटेक्सचा असतो. पण हे स्वच्छ ठेवण्यासाठी तीन ते सहा वेळा परिधान केल्यानंतर धुवावे लागतात.
या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्गंधीयुक्त शूज चांगल्याप्रकारे स्वच्छ करु शकता.