सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केल्यानंतर याचा जिओला मोठा फायदा झाला आहे. फेसबुकनं जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे. कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. तर दुसरीकडे जिओनं इन्फोसिस आणि एचडीएफसी लिमिटेड यासारख्या दिग्गज कंपन्यांना मात्र मागे टाकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओनं बाजारात येताच अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तसंच केवळ ४ वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता.

या आहेत टॉप ४ कंपन्या

रिलायन्स इंडस्ट्रीज: ८.६१ लाख कोटी

टीसीएस: ६.६२ लाख कोटी

एचयूएल: ५.०८ लाख कोटी

एचडीएफसी बँक: ५.०३ लाख कोटी

याकंपन्यांपेक्षा जिओ पुढे

एचडीएफसी लि.: २.८७ लाख कोटी

एअरटेल: २.७३ लाख कोटी

इन्फोसिस: २.७३ लाख कोटी

आयटीसी लि.: २.२३ लाख कोटी

कोटक महिंद्रा: २.१८ लाख कोटी

ICICI बँक: २.१० लाख कोटी

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio in top 5 only 4 largest listed companies in india more valuable than rils telecom arm facebook investment jud