शरीरातील लसिका रक्तपेशी (लिंफोसाइट) कमी झाल्या तर ती आगामी काळातील आजाराची धोक्याची सूचना असते असे एका डॅनिश संशोधनात दिसून आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांच्या मते लसिका पेशींची संख्यापातळी कमी झाली तर कुठल्याही रोगाने मृत्यू ओढवण्याची जोखीम साठ टक्क्य़ांनी वाढते. लिंफोपेनिया या अवस्थेत लसिका रक्तपेशी कमी होतात. अनेकदा रक्तचाचण्यातून ही गोष्ट समजत असतानाही त्याक डे होणारे दुर्लक्ष हे घातक ठरते. त्यासाठी रुग्णांना पुढील सल्ला घेण्याची सूचना दिली जात नाही. त्यामुळे पुढील आजारांची धोक्याची घंटाही समजत नाही.

डेन्मार्कमधील कोपनहेगन युनिव्हर्सिटी रुग्णालयातील स्टिग बोजनसन यांनी म्हटले आहे,की लिंफोपेनिया आजाराच्या संशोधनात काही रुग्ण सहभागी झाले होते, पण त्यांच्यातील जोखीम जास्त दिसून आली. वयपरत्वे होणाऱ्या आजारांसह सर्वच बाबतीत या रुग्णांचा धोका वाढलेला असतो. कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात डॅनिश वंशाच्या २० ते १०० वयोगटातील १०८१३५ व्यक्तींचा अभ्यास क रण्यात आला.

२००३ ते २०१५ या काळात कोपनहेगन लोकसंख्या अभ्यासाअंतर्गत त्यांची नोंदणी करण्यात आली होती. कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूची जोखीम लसिका पेशी कमी झाल्याने १.६ पट वाढते. कर्करोग, हृदयरोग, श्वसनरोग, संसर्ग यामुळे मरण्याची जोखीम २.८ पट वाढते. या काळात एकूण १०३७२ जण मरण पावले. वय वाढते तशी लसिका पेशींची संख्या कमी होते त्यामुळे माणूस अशक्त बनत जातो. त्यामुळे यापुढे डॉक्टरांनी रक्त तपासणीचे अहवाल बघताना लसिका पेशींच्या संख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रतिपादन करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low levels of lymphocyte blood cells associated with high risk of death mppg