भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष ढंगात उभारी घेतलेली लवली प्रोफेशनल इन्स्टिट्युट (एलपीयू) देशातील अशी एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे जी इंजीनिअरिंगच्या शिक्षणासाठी कुठल्याही प्रकारे आयआयटीपेक्षा कमी नाहीये. ही केवळ इंजीनिअरिंगच नाही तर अन्य प्रकारच्या शिक्षणासाठीही श्रेष्ठ संस्था आहे. एलपीयूचं सगळ्यात मोठं शक्तिस्थान म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंटच्या उत्कृष्ट संधी.
आपल्या या गुणामुळे व याच कारणामुळे विद्यापीठातली बीटेक कम्प्युटर सायन्स व इंजीनिअरिंगची तिसऱ्या वर्षाची हुषार विद्यार्थिनी तान्या अरोराला गेल्या वर्षी २०१९च्या शेवटी तिचं शिक्षण पूर्ण व्हायच्या आधीच आघाडीची कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टमध्ये ४२ लाख रुपयांच्या नोकरीसाठी निवडण्यात आले. २०१९ मधली इंजीनिअरिंग क्षेत्रातली कुठल्याही फ्रेशरसाठी मिळालेली ही सगळ्यात मोठी ऑफर आहे. याच प्रकारे गेली तीन वर्षे सलग एलपीयूने आपल्या विद्यार्थ्यांच्या विक्रमी प्लेसमेंट्स बघितल्या आहेत. आता तान्याला मिळालेल्या चांगल्या ऑफरमुळे एलपीयूने उत्तर भारतात प्लेसमेंट रेकॉर्डच्या बाबतीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपलं जन्मस्थळ असलेल्या डेहराडूनपासून अनेक कोस लांब येत एलपीयूमध्ये शिक्षणाला प्राधान्य देणारी तान्या अरोरा गर्वानं सांगते की तिला मिळालेल्या यशाचं श्रेय एलपीयू, शिक्षक व स्पेशल मेंटर्सना जातं, जे अत्यंत परीश्रमपूर्वक व ट्रेनिंगच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी कुशल मार्गदर्शन करतात. माझ्या आई वडिलांचा व माझा एलपीयूमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय कसा योग्य होता हे आज सगळ्यांसमोर आहे, तान्या सांगते. खरंतर यावेळी ज्या प्रकारे तान्या अरोराला सुवर्णसंधी मिळाली आहे, त्याच प्रकारे एलपीयूमधील अॅडव्हान्स शिक्षण प्रणालीमुळे तान्याप्रमाणेच अनेक विद्यार्थ्यांना उल्लेखनीय प्लेसमेंटच्या संधी मिळत आहेत.

वास्तवात गुगल, अॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांमध्ये एलपीयूचे विद्यार्थी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार घेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. फक्त कॉगनिजंटसारखी कंपनी जी जगातली तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी आहे, या कंपनीनेच एलपीयूच्या १९०० विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे. या प्रकारे जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एलपीयूचे विद्यार्थी बड्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.
एलपीयू स्थापनेपासूनच कायम चांगल्या प्लेसमेंटसाठी आणि कालानुरूप इनोवेटिव शिक्षणासाठी ओळखलं जातं. याचं महत्त्वाचं कारण आहे की, एलपीयूनं इंडस्ट्रीच्या गरजांनुसार संतुलन राखणं आणि त्यामध्ये सातत्यानं बदल करणं हे ही आहे. एलपीयू विद्यार्थ्यांना आंत्रप्रिनरशिपसाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीलाही मजबूत करतं. यामुळेच ही संस्था नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी इंडस्ट्री व समाजात एक चांगली उंची प्राप्त करू शकलं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी एक मजबूत आणि सार्थ इंटरफेस झाल्यामुळे नेहमीच विद्यापीठात मोठ्या संख्येनं हाय प्रोफाइल प्रोफेशनल नियमितरीत्या विद्यार्थ्यांशी आपले अनुभव शेअर करतात आणि विद्यार्थ्यांना चांगलं औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी इवोल्यूशन प्रोसेसच्या माध्यमातून तयार करतात. या सगळ्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित इंडस्ट्रीसाठी लाइव प्रोजेक्टवर काम करण्याची संधीही मिळवतात.

या व्हिडीओच्या माध्यमातून बघा तान्याच्या या यशाचा प्रवास

एलपीयूमध्ये शिक्षण देत असलेले ३६०० पेक्षा जास्त फॅकल्टी मेंबर्स देश विदेशातल्या उच्च संस्थांमधून निवडण्यात आले आहेत. बहुतेक फॅकल्टी आयआयटी, एनआयटी व हार्वर्ड, स्टॅनफोर्डसारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधील आहेत. एलपीयूमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण दिलं जात नाही तर विद्यार्थी एक्सपरिमेंट्सच्या माध्यमातून प्रयोगशीलतेतून शिकतात. येथील मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे विद्यार्थी स्वत: कार बनवतात, कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सच्या नुसार मोबाइल अॅप बनवणं सक्तीचं आहे. आणि फॅशन टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर फॅशन शोजचं आयोजन करतात. वास्तवात इथं प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोग्रामला अनुरूप प्रॅक्टिकल ट्रेनिंगच्या माध्यमातून शिकवलं जातं.
तसंही आता एलपीयू आपल्या अनेक वैशिष्ट्यांमुळे केवळ देशातच नाही तर विदेशातही प्रत्येक क्षेत्रातल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी बेस्ट चॉइस बनला आहे. जर विद्यार्थ्यांना आयआयटीत प्रवेश मिळाला नाही तर ते दुसऱ्या कुठल्या उच्च कोटीच्या शिक्षणसंस्थेत इंजीनिअरिंगमध्ये करीअर करू शकत नाहीत अशी स्थिती आता नाहीये. अशा स्थितीत आपल्या विविधांगी विकासासाठी विद्यार्थी एलपीयूला प्राधान्य देतात कारण ६०० एकरांमध्ये पसरलेला एलपीयूचा कँपस कुठल्याही शहरापेक्षा कमी नाहीये. आत तर एलपीयूला टाउनशिप युनिव्हर्सिटी नावानंही ओळखलं जातं. इथं एकाच कँपसमध्ये आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लास रूम्स, देशातला सगळ्यात मोठा ऑडिटोरियम, ऑलिंपिकच्या दर्जाचं तयार स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बहुमजली ग्रंथालय, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, बँका, पोस्ट ऑफिस आणि अगदी स्वत:चं हॉटेलदेखील आहे. येथील हॉस्पिटल व परीसरातील फार्मसी केंद्र विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यासाठी २४ तास खुलं असतं.

एलपीयू कँपसमध्ये भारतातल्या सगळ्या राज्यांसह व केंद्रशासित प्रदेशांसह ७० पेक्षा जास्त देशांमधून ३०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी भिन्न संस्कृती, भाषा, पोशाख, परंपरा व रीतीरिवाजोंसह राहतात व एकमेकांशी मिळून मिसळून ज्ञान व व्यावहारिक गोष्टी शिकतात, जेणेकरून ते भविष्यात वैशिवक नागरिक बनतील व विश्वभरात मानवतेसाठी आपलं वेगळं स्थान निश्चित करू शकतील. या बरोबरच विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासावर पूर्ण लक्ष दिलं जातं. विद्यापीठात १५० पेक्षा जास्त सोसायट्या आहेत, जिथं विद्यार्थी आपल्या कलानुसार सहभाग घेऊ शकतात, उदाहरणार्थ डान्स, संगीत, नाटक, साहित्य, रोबोटिक्स, योगविद्या तसंच क्रिकेट, बास्केट बॉलसारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
देशातल्या सगळ्या होतकरू विद्यार्थ्यांना एका चांगल्या विद्यापीठात शिकण्याची संधी मिळावी व कुठल्याही आर्थिक कारणामुळे ते मागे पडू नयेत यासाठी एलपीयूमध्ये दाखल होताना विद्यापीठाचीच स्कॉलरशिप टेस्ट ‘एलपीयू नेस्ट’ पण घेतली जाते. प्रत्यक्षात एलपीयूच्या प्रतिष्ठित प्रोग्राममध्ये निवड विश्वविद्यालयाच्या स्वत:च्या प्रवेश परीक्षेच्या – एलपीयूएनईएसटी (एलपीयू नेशनल एन्ट्रन्स अँड स्कॉलरशिप टेस्ट) – माध्यमातून योग्यतेच्या आधारावर होते. युनिव्हर्सिटीकडून ही टेस्ट ऑनलाइन व संपूर्ण भारतात २०० पेक्षा जास्त शहरांमध्ये घेण्यात येते. विश्विविद्यालयात केवळ दाखल होण्यासाठी ही प्रवेशपरीक्षा नाहीये तर ही शिष्यवृत्तीपण देते. परीक्षेतील कामगिरीच्या आधारे प्रति विद्यार्थी ४.३ लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. वर्ष २०२० च्या प्रवेशासाठी एलपीयू एप्रिल २०२० मध्ये या टेस्टचं आयोजन सीबीएसईच्या नवीन जेईई पॅटर्न अनुसार करणार आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा – https://www.lpu.in

(प्रायोजित)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpu no less important than iit know why