नवं वर्ष म्हटलं की, नवे संकल्प असतात. नव्या वर्षापासून चांगल्या गोष्टी करण्यासाठी आग्रह असतो. मात्र अनेकदा संकल्प चुकतात आणि अर्धवट सुटतात. यासाठी संकल्प करताना त्याला सवयींचं स्वरुप प्राप्त झालं पाहीजे. तसेच सवयी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहीजे. यामुळे आपल्या आनंद तर मिळतोच. त्याचबरोबर इतर गोष्टी करण्यासाठी प्रेरणाही मिळते. नवीन वर्ष येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. तुमच्या दिनचर्येतील एक छोटासा बदल तुम्हाला नवीन वर्षात आनंदी, निरोगी आणि दीर्घायुषी बनवू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रह्ममुहूर्तावर उठा
शास्त्रानुसार झोपेतून उठण्यासाठी ब्रह्म मुहूर्त सर्वोत्तम आहे. यावेळी उठल्याने सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. यावेळेत स्नान करून आपल्या इष्टदेवाची किंवा देवाची पूजा करणे, ध्यान करणे, अभ्यास करणे व पुण्यकर्म करणे अत्यंत शुभ आहे. या काळात केलेल्या देवपूजेचे फळही लवकर प्राप्त होते.

व्यायाम आणि योगा करा
जर तुम्ही उशिरा उठत असाल तर नवीन वर्षात तुमची वाईट सवय बदला. निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून दोन ते तीन किमी चालण्यासाठी जा. तुमचे वय काहीही असो, व्यायाम, योगा किंवा वेगवान चालण्यासाठी दररोज ३० मिनिटे बाजूला ठेवा. तुमच्या आवडीनुसार वेळ आणि कोणता व्यायाम करायचा हे तुम्ही निवडू शकता.

पौष्टिक आहार घ्या
फक्त घरचेच अन्न खाण्याचा संकल्प करा. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. बाहेरचं खाण्याऐवजी जे पैसे उरतील त्यातून सुका मेवा आणि फळांवर खर्च करा.

Astrology: कमी वयात चार राशीचे लोकं कमवतात संपत्ती आणि प्रसिद्धी!, तुमची रास आहे का?

अन्न वाया घालवू नका
अन्नाची नासाडी किंवा निंदा करणे हे शास्त्रात महापाप मानले गेले आहे.अन्न हे ब्रह्मा,विष्णू आणि रुद्राचे रूप आहे, म्हणूनच अन्न हे पूर्णब्रह्म आहे,असं सांगितले आहे. जो व्यत्ती अन्न वाया घालवतो किंवा निंदा करतो तो पापाचा भागीदार बनतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने अन्नाचा दुरुपयोग टाळावा.

झाडे लावा झाडे वाढवा
निसर्गामुळे प्रत्येकाचं मन प्रसन्न होतं. निसर्गातून आपल्याला उर्जा मिळते. झाडं शुद्ध प्राणवायू आणि पर्यावरणाचा समतोल राखतात. तसेच अनेक झाडांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे झाडांचं आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे वर्षभरात किमान पाच झाडं लावण्याचा संकल्प करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make five resolutions in the new year 2022 rmt