Premium

Kitchen Jugaad: ‘हे’ ५ पदार्थ मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका; भांड्यातील पाती बिघडून खडखडा वाजू लागतील

Kitchen Tips Marathi: आपण अशा वस्तू पाहणार आहोत ज्या मिक्सरला लावल्याने मिक्सरची भांडी खराब होऊ शकतात. काळजी करू नका आपण त्याला पर्यायी मार्ग सुद्धा जाणून घेणार आहोत.

Never Ever Grind These Five Food Items In Mixer it will cost Money and Mixie Blades Will Make Noise And Loose Sharpness
मिक्सरला 'या' ५ वस्तू कधीच वाटू नका,नाहीतर वाया जातील पैसे (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kitchen Jugaad: पाटा- वरवंट्यासारखी जुनी साधनं जाऊन मिक्सर आले आणि आपला आतातरी वेळ वाचू लागला. पण मशीन म्हटली की बिघाड आलाच. आणि योगायोग म्हणावा की काय पण नेमकं घाईच्या वेळीच कसं काम बंद करायचं हे बहुसंख्य मशीन्सना बरोबर कळतं. तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल की एखाद्या वेळी घरी लाईट जाणार असते म्हणून वेळेत वाटणाची कामं व्हावी, यासाठी तुम्ही घाई करत असता पण अशावेळी अचानक मिक्सरच बंद पडतो, खडखडा वाजू लागतो, आवाज येतो पण पाती काही फिरतच नाहीत, किंवा फिरतात पण गोष्टी वाटल्याच जात नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं कळतच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण तुम्हाला माहित आहे का? हा काही फक्त योगायोग नाही तुम्ही काही वेळेला सोशल मीडिया किंवा इतरत्र बघून काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने मिक्सरला लावलेल्या असतात त्यामुळे पातीची क्वालिटी (धार, तीव्रता, सांधणारे स्क्रू) कमी झालेली असते. आज आपण अशा वस्तू पाहणार आहोत ज्या मिक्सरला लावल्याने मिक्सरची भांडी खराब होऊ शकतात. काळजी करू नका आपण त्याला पर्यायी मार्ग सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग..

मिक्सरला ‘या’ ५ वस्तू कधीच लावू नका

१) बर्फ: अलीकडे अनेक कारणांसाठी बर्फ वापरला जातो अगदी चेहऱ्याला लावण्यापासून ते ड्रिंकमध्ये टाकून पिण्यासाठी.. काही वेळा जेव्हा आपल्याला कोल्ड कॉफी वगैरे बनवायची असेल तर बर्फाचे क्यूब टाकण्यापेक्षा चुरा घातला तर जास्त छान पोत येतो. पण यासाठी बर्फ मिक्सरच्या भांड्यात वाटणार असाल तर मात्र तुम्हीच तुमचा त्रास वाढवणार आहात हे लक्षात असुद्या.

२) कॉफी बीन्स: कॉफीचा सुगंध अनेकांना आवडतो. तुम्ही सुद्धा आवडीने समजा एखाद्या ब्रँडच्या कॉफी बीन्स आणल्या असतील आणि तुम्हाला घरी त्याची पावडर करायची असेल तर त्यासाठी मिक्सरचा वापर टाळावा. याऐवजी चक्क तुम्ही खलबत्त्यात बीन्स वाटू शकता.

३) खडे मसाले: आता ही चूक आपल्याकडे तर साधारण दर रविवारी होते. खडे मसाले म्हणजेच वेलदोडे, मोठ्या वेलच्या, दालचिनी, लवंगा, हे सगळं काहीवेळा मिक्सरच्या पात्यांमध्ये अडकू शकतं. त्यामुळे काम तर होत नाहीच पण उलट मिक्सर खराब होऊ शकतं. कमी प्रमाणात मसाला असेल तर तुम्ही खलबत्त्याचा वापर करायला हवा. उलट यामुळेच मसाल्याची पावडर न होता थोडा जाडसर पोत राहतो आणि यामुळे जेवणाची लज्जतही वाढते.

४) गरम पदार्थ: आपल्याकडे कांदा- खोबऱ्याचे वाटण जेव्हा बनवले जाते तेव्हा आधी कांदा व खोबरे खरपूस भाजून घेतले जाते. यामुळे चव सुधारते पण हे पदार्थ गरम असताना लगेच वाटायला घेऊ नका यामुळे भांड्याचे झाकण फाटू शकते. हीच गोष्ट शेंगदाण्याच्या कुटाच्या बाबतही लागू होते. भाजल्यावर या गोष्टी काही मिनिटे तरी थंड होऊ द्या मग वाटा.

५) फ्रोजन पदार्थ: जो नियम गरम पदार्थांना तोच फ्रीजरमध्ये ठेवलेल्या वस्तूंना सुद्धा लागू होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही फ्रीजमधून एखादी गोठलेली वस्तू काढता तेव्हा त्यात कडकपणा आलेला असतो यामुळेच बर्फाने जसं भांडं खराब होतं तसं व्हायची शक्यता असते. काही वेळ थांबा मग वाटू शकता.

हे ही वाचा<< १ वाटी बेसन, दह्यासह ‘हा’ पदार्थ वापरून तांब्याची भांडी करा लख्ख; दिवा, ताम्हण घासायचे कष्टच नाही, Video पाहा

तुम्ही सुद्धा या स्मार्ट किचन टिप्स वापरून पाहू शकता. वर वर जरी सोपा व साधा सल्ला वाटत असला तरी सततच्या मिक्सरच्या बिघाडापासून सुटका करून देण्यासाठी या हॅक खूप कमी येतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Never ever grind these five food items in mixer it will cost money and mixie blades will make noise and loose sharpness svs

First published on: 12-09-2023 at 16:00 IST
Next Story
Age Gap Relationship : ‘एज गॅप रिलेशनशिप’ म्हणजे काय? जाणून घ्या याचे चांगले अन् वाईट परिणाम