नोकियाचा पहिला 5G स्मार्टफोन आला आहे. नोकियाचे स्मार्टफोन बनविणाऱ्या एचएमडी ग्लोबलने Nokia 8.3 5G हा स्मार्टफोन एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये लाँच केला. हा जगातला पहिला ‘फ्यूचर-प्रूफ फोन’ असल्याचा कंपनीने दावा केलाय. या नव्या नोकिया फोनद्वारे युजर्सना कमी किंमतीत 5G अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं कंपनीद्वारे सांगण्यात आलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ZEISS सिनेमॅटिक इफेक्ट्स वापरण्यात आलेला हा नोकियाचा पहिला फोन आहे. क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 765G मॉड्यूलर मोबाइल प्लॅटफॉर्म असलेल्या या स्मार्टफोनमध्ये Zeiss ऑप्टिक्ससोबत PureView क्वॉड कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूला अॅक्शन कॅम मोडसारख्या स्टँडर्ड नोकिया कॅमेरा फीचर्ससह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी Zeiss ऑप्टिक्ससोबत 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

6.81 इंच फुल HD+प्युअरडिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500 mAh क्षमतेची बॅटरी आहे. तसेच, ऑडिओ जॅक, एफएम रेडिओ, OZO ऑडिओ, ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल बँड वाय-फाय यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेला हा फोन केवळ 600 MHz 5G बँडशिवाय मिड बँड्स आणि 3.8GHz हाय बँड्सलाही सपोर्ट करतो. या फोनवर डाव्या बाजूला पंच-होल डिझाइनही आहे.

किंमत :-
नोकियाच्या या पहिल्या 5G स्मार्टफोनची किंमत जवळपास 599 युरो (जवळपास 48,000 रुपये) आहे. ही किंमत 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 649 युरो (जवळपास 52,000 रुपये) आहे. पोलर नाइट कलरमध्ये आलेला हा फोन पुढील दोन ते तीन महिन्यात युरोपीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. लवकरच हा फोन भारतीय बाजारातही लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nokia 8 3 5g nokias first 5g smartphone launched know price specifications and all details sas