Oppo कंपनीने फेब्रुवारी महिन्यात आपला Oppo K1 स्मार्टफोन लाँच केला होता. त्यावेळी 16 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत होती. मात्र, आता कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन आता 14 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. परिणामी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर असणारा हा सर्वात स्वस्त फोन ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि गेम खेळणाऱ्यांना दर्जेदार अनुभव यावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये हायपर बूस्ट तंत्रज्ञान आहे. इतर वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये वॉटरड्रॉप नॉच, 6.4 इंच डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ग्रेडिअंट ग्लास रिअर पॅनलचा समावेश आहे. सेल्फीसाठी यामध्ये 25 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

किंमत आणि लाँच ऑफर –
या स्मार्टफोनचं 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडल भारतात 16 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.  अॅस्ट्रल ब्ल्यू आणि पिआनो ब्लॅक रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चिनमधील बाजारात लाँच करण्यात आला होता.

Oppo K1 स्पेसिफिकेशन –

डिस्प्ले – 6.41 इंच
प्रोसेसर – 2.2 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर
फ्रंट कॅमेरा – 25-मेगापिक्सल
रिझोल्यूशन – 1080×2340 पिक्सल
रॅम – 4 जीबी
ओएस – अँड्रॉ़इड 8.1 Oreo
स्टोरेज – 64 जीबी
रिअर कॅमेरा – 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल
बॅटरी क्षमता – 3600 एमएएच

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oppo k1 price cut in india