स्मार्टफोनच्या बाजारात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर Xiaomi कंपनीने इतर उपकरणांकडे आपला मोर्चा वळवला आहे. स्मार्टफोनशिवाय कंपनीने आतापर्यंत स्मार्ट स्पोर्ट्स शूज, वॉशिंग मशीन आणि एअर कंडीशनर यांसारखे अनेक दमदार उपकरण बाजारात आणले आहेत. यानंतर आता कंपनीने सूटकेस लाँच केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने रेडमी K20 प्रो आणि रेडमी K20 या दोन्ही स्मार्टफोनसोबतच सूटकेस देखील लाँच केली आहे. या सूटकेसता रेड कलर पॅटर्न आकर्षक आहे. 20 इंचाच्या या सूटकेसच्या एका बाजूला कस्टम फॉन्टमध्ये पांढऱ्या रंगातील रेडमीचा लोगो दिसतोय. ही सूटकेस बनविण्यासाठी कॉस्ट्रॉन पीसी मटेरियलच्या तीन थरांचा वापर करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. यामुळे ही सूटकेस इतरांच्या तुलनेत अधिक मजबूत असल्याचं कंपनीने म्हटलं. सूटकेसला मॅट फिनिशिंग देण्यात आली असून 4 व्हिल्स 360 डिग्रीत रोटेट होऊ शकतात. ट्रॉलीचं हँडल अॅल्युमिनियम पासून तयार करण्यात आलं आहे. हे हँडल 4 गिअरपर्यंत अॅडजस्ट करता येतं.

सूटकेसच्या आतील बाजूबाबत सांगायचं झाल्यास विविध आकाराच्या सामानाचा विचार करुन यात निरनिराळे कप्पे आहेत. याशिवाय यामध्ये मल्टिफंक्शनल पॉकेट देखील आहे. आतील बाजूसाठी सॉफ्ट आणि स्क्रीन फ्रेंडली अशा पॉलिस्टर व्हायबर फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. जून महिन्यात या सूटकेसची विक्री सुरू होईल. याची किंमत 299 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 3000 रुपये आहे. रेडमी K20 स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या काही निवडक ग्राहकांसाठी ही सूटकेस केवळ 199 युआन म्हणजे जवळपास 2000 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redmi 20 inch suitcase launched