शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंग कंपनीने यावर्षीच गॅलेक्सी M नावाची एक बजेट सीरिज भारतीय बाजारात लाँच केली. यातील Galaxy M10 या कंपनीच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. नव्या किंमतीसह हा स्मार्टफोन अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Galaxy M10 हा स्मार्टफोन 2GB + 16GB व्हेरिअंट आणि 3GB + 32GB व्हेरिअंट अशा दोन प्रकारात उपलब्ध आला आहे. अनुक्रमे 7 हजार 990 आणि 8 हजार 990 रुपये किंमत आहे. पण किंमतीत 1 हजार रुपयांची कपात करण्यात आल्यामुळे अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन हे फोन अनुक्रमे 6 हजार 990 आणि 7 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

गॅलेक्सी एम10 मध्ये 6.2 इंच एचडी+डिस्प्ले (रिझोल्युशन 720X1520 पिक्सल) आणि वॉटरड्रॉप नॉच आहे. 4एमएम ऑक्टाकोर Exynos 7870 SoC प्रोसेसर यात देण्यात आलंय, तसंच अँड्रॉइड ओरिओ 9.1 प्रणालीवर हा कार्यरत असेल. यामध्ये 3,400 एमएएच बॅटरी आणि मायक्रो युएसबी पोर्ट आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सल+ 5 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, तर सेल्फीसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy m10 price cut sas