फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा 'या' टिप्स | Soft and fluffy chapatis can also be made from dough stored in the fridge; Follow these tips | Loksatta

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा ‘या’ टिप्स

फ्रीजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स आहेत ज्याचा आवर्जून वापर करून बघा.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासूनही बनवू शकता मऊ आणि लुसलुशीत चपाती; फॉलो करा ‘या’ टिप्स

भारतीय जेवणात चपातीचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती असेलच. अनेकांचे तर जेवण चपाती खाल्ल्याशिवाय पूर्ण होत नाही. जरी चपाती बनवणे फारसे अवघड नसले तरी अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेल्या चपात्या कधीच मऊ होत नाहीत. अनेकदा चपात्या मऊ झाल्या तरी थंड झाल्यावर त्या मऊ राहत नाहीत. यासोबतच फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेपासून जास्त मऊ, लुसलुशीत चपाती बनत नाही ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. या सगळ्या समस्यांचे उत्तर जाणून घ्या.

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक वापरणे योग्य नाही असे मानले जाते. आपण हे आपल्या सोयीसाठी करत असतोच. फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी टिप्स आहेत ज्याचा आवर्जून वापर करून बघा.

(हे ही वाचा: चपाती मऊ आणि छान फुलत नाही? मग ट्राय करा ‘या’ टिप्स)

कणिक पुन्हा मळणे

फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक बाहेर काढून कोमट पाण्याने थोडे मळून घ्या. अनेक वेळा कणिक फ्रिजमध्ये ठेवल्याने तिच्यावर कडक थर तयार होतो. हा थर वरून वरून काढून टाका. यासोबतच त्यावर थोडे कोमट पाणी टाकून मळून घ्या. या पद्धतीमुळे पिठाचा थंडपणा दूर होतो आणि त्याची फर्मेंटेशन प्रक्रिया सुधारते.

मंद आचेवर चपाती भाजावी

जर तुम्ही फ्रिजमधून कणिक काढून चपाती बनवत असाल आणि कोमट पाण्याने मळून घ्यायचा वेळ नसेल, तर मोठ्या आचेवर थेट चपाती भाजू नका. असे केल्याने चापाती खराब होऊ शकतात आणि वरचा थर खूप कडक होऊ शकतो. म्हणूनच चपाती मंद आचेवर भाजावी.

(हे ही वाचा: Paneer vs Tofu : पनीर आणि टोफूमध्ये काय आहे फरक?)

लगेच चापाती बनवू नका

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणिकेपासून चपाती बनवत असाल तर त्याच्यापासून लगेच चपाती बनवू नका. कणिक बाहेर काढून खोलीच्या तपमानावर थोडा वेळ ठेवा. फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच चपाती बनवल्या तर त्या खूप कडक होतील आणि त्याच वेळी थंड झाल्यावर त्यांची चवही वेगळी असेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2022 at 14:10 IST
Next Story
तुम्ही तुमच्या मुलांनाही शेळीचे दूध देताय का ? प्रथम माहिती जाणून घ्या