साधारण एकसारख्या दिसणाऱ्या पण नावं वेगवेगळी असलेल्या पदार्थांमध्ये आपला नेहमीच संभ्रम उडतो. आता योगर्ट आणि दह्याचेच घ्या ना! दह्याचा फार पूर्वीपासून भारतीयांच्या आहारामध्ये समावेश होतो, पण हल्ली सुपर मार्केटमध्ये मिळणाऱ्या योगार्टचाही आपल्या आहारामध्ये समावेश होऊ लागला आहे. हे पदार्थ दिसायला एकसारखेच दिसतात. म्हणून आपला संभ्रम अधिक वाढतो. अनेकदा योगर्टला दही समजण्याची चूक आपण करतो, पण या दोन्ही पदार्थांमध्ये फरक आहे आणि तो आपल्याला जाणून घ्यायला हवा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Healthy Living : दही कधी खावे?

योगर्ट हा मुळचा तुर्की भाषेतील शब्द आहे. प्राचीन मेसोपोटामिया संस्कृतीत या पदार्थाचा उल्लेख आढळतो. हजारो वर्षांपासून मध्यपूर्व देशांतील खाद्यसंस्कृतीमध्ये योगर्टचा वापर केल्याचेही संदर्भ आढळतात. दह्याप्रमाणे दुधावरील किण्वन प्रक्रियेने योगर्ट तयार होतं. दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोजचे किण्वन होऊन लॅक्टीक आम्लाची निर्मिती होते. योगर्ट तयार करण्यासाठी ‘योगर्ट कल्चर’चा वापर केला जातो. म्हणजे ज्या जिवांणूपासून योगर्ट तयार होतं त्यांची पैदास केली जाते. यासाठी प्रामुख्याने गायीच्या दुधाचा वापर केला जातो.

बाजारात योगर्टचे अनेक प्रकार उपलब्ध आहे यात ‘फोझन योगर्ट’, ‘स्वीट योगर्ट’, ‘फ्लेवर्ड योगर्ट’ असे अनेक प्रकार आहेत. त्यातून भारतीय बाजारपेठेत ‘फ्लेवर्ड योगर्ट’ला जास्त पसंती आहे. वेगवेगळ्या फळांच्या चवीत फ्लेवर्ड योगर्ट बाजारात मिळते.

Healthy Living : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा!

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the difference between yogurt and curd