‘पडसाद’मधील ‘ते’ लोक जबाबदार’ हे शारंगधर बोडस (१२ मार्च) यांचे पत्र वाचले. लेखकाला स्पष्ट बोलायची भीती वाटत असल्याने त्यांनी ‘ते’ हा शब्दप्रयोग केला असावा बहुतेक. मुळात मुस्लीम अथवा ख्रिश्चन धर्मीय हे आपल्या धार्मिक संस्कृतीबद्दल अतिशय जागरूक आहेत. त्यामुळे त्यांनी जर हिंदी अथवा उर्दूमिश्रित मराठी भाषेचा रोजच्या बोलण्यात वापर केला तर तो त्यांच्या सांस्कृतिक वा धार्मिक जगण्याचा भाग आहे. राहता राहिला मुद्दा बौद्ध, जैन, शीख, भारतीय पारशी आणि भारतीय ज्यू धर्मीयांचा, तर यातील बहुतांश लोक हे कळत-नकळतपणे हिंदू तसेच ब्राह्मणी धर्माच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. त्यांच्यातील बहुतेकांना आपल्या धर्माचा स्वाभिमान तसेच त्यातील मूल्ये, विचारधारा, तसेच धार्मिक संस्कृती यांचा विसर पडल्याने अथवा जागरूकता नसल्याने हिंदू धर्माच्या सांस्कृतिक व धार्मिक अंगाचा पगडा बाळगण्यात यांना जास्त स्वारस्य आहे. त्यामुळे आपसूकच हिंदू धर्मीयांना तौलनिकदृष्टय़ा जवळचे वाटतात व लांबचे वाटतात. आणि मराठी सांस्कृतिक क्षेत्र (मग ते साहित्यिक असो व चित्रपट, नाटय़सृष्टी असो) किती ढोंगी व बुरसटलेले आहे, हे मी वेगळे सांगायची गरज नाही. तेव्हा प्रबोधनाची जास्त गरज ही ‘मराठी’ माध्यमकर्त्यांना आहे. ‘त्यां’ना नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित अशोक पवार

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers reaction on lokrang articles zws 70
First published on: 26-03-2023 at 01:06 IST