राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७६,६१,०७७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यात आज १२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,६५,२७,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,४४,९१५ (१०.२५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,४८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ८१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ३९९४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ३३३४ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आजपर्यंत एकूण ८८०४ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ७५०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि १२९७ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 thousand 966 corona patients were found in the state today msr